शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाच्या ठेकेदारावर महापालिका झाली मेहरबान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 18:13 IST

महापालिकेच्या वतीने पुलाच्या कामास मुदतवाढ दिल्यानंतरही काम संथगतीने सुरू

ठळक मुद्देवाहनचालकांना सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतराचा मारावा लागतो वळसाउड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरच्या कामास विलंब झाल्याने पुन्हा आठ महिन्यांची मुदतवाढ

पिंपरी : महापालिकेच्या वतीने विविध महत्त्वाकांशी प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र, कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न  केले जात नाहीत. निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकात उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरच्या कामास विलंब झाल्याने पुन्हा आठ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. महापालिका ठेकेदारांवर सत्ताधारी आणि प्रशासन मेहरबान असल्याचे दिसून येत आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीच्या प्रवेशद्वारावर अर्थात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे काम बी. जे. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीस दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या श्रेयवादात पुलाचे काम एक वर्ष रखडले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत आल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे यांनी या प्रकल्पास मंजुरी दिली होती. त्यानंतर २६ जून २०१७ रोजी कामाचे आदेश दिले. या प्रकल्पासाठी ९० कोटी ५३ लाख खर्च अपेक्षित धरला होता. यासाठी अडीच वर्षांची मुदत देण्यात आली होती. ती मुदत २६ डिसेंबरला पूर्ण झाली होती. मात्र, पुलाचे केवळ साठच टक्के काम झाले आहे. वीजवाहिन्या स्थलांतरात अडचणी आल्याने ठेकेदाराने मुदतवाढ मागितली होती. त्यास महापालिकेतील भाजपाचे सत्ताधारी आणि प्रशासनाने ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. भक्ती-शक्ती चौकातून उच्चदाब विद्युत वाहिन्या जातात. या वाहिन्यांसाठी आठ टॉवरचे काम अनेक महिने प्रलंबित होते. निवडणूक कालखंडात विद्युत वाहिन्या काढण्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. त्यास तीन वेळा मुदतवाढही दिली होती. विद्युत वाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतरच पुलाचे काम करता येणार असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणने आहे.महापालिकेच्या वतीने पुलाच्या कामास मुदतवाढ दिल्यानंतरही काम संथगतीने सुरू आहे. चौक बंद केल्याने वाहतूक रूपीनगर व प्राधिकरणातून वळविली आहे. त्यामुळे वाहनचालकांना सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतराचा वळसा मारावा लागत आहे. त्यामुळे नागरवस्तीमध्ये अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नागरी भागात अवजड वाहने येत असल्याने प्राधिकरणातील नागरिक त्रस्त झाले आहेत.......४निगडी येथील पुलाच्या चाललेल्या कामाची पाहणी महापौर उषा ढोरे यांनी केली. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, मनसे गटनेता सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, नगरसेवक अमित गावडे, उत्तम केंदळे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, ज्ञानदेव झुंधारे आदी उपस्थित होते. ........४पालखी आगमन, वाहतूक वळण, नागरिकांच्या अडचणींचा विचार करता प्रकल्पाचे काम नियोजनपूर्वक तातडीने करावे. ठेकेदाराने तीन पाळींमध्ये काम करावे. या पुलाबाबत अधिकाºयांनी नियोजन करून दर पंधरा दिवसांनी अहवाल सादर करावा, असे महापौरांनी आदेश दिले. ..........उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर अशी दोन कामे सुरू आहेत. या कामात उच्चदाब वाहिन्यांचे स्थलांतर आणि चौकातील वाहतूक वळविण्याचे प्रमुख अडथळे दूर झाले आहेत. ८० टक्के टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलासाठी एकूण ९०.५४ कोटी खर्च अपेक्षित होता. त्यापैकी ७२.१० कोटी खर्च झाला. कामाचा आढावा घेऊन प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे.- श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, स्थापत्य विभाग............निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील पुलामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार आहे. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, एमएससीबीच्या वाहिन्या आणि वाहतूक नियंत्रणासाठी परवानगी न दिल्याने दोन महिन्यांचा कालखंड वाया गेला. पावसाळ्यापूर्वी या प्रकल्पाचे काम होणे गरजेचे आहे.- सचिन चिखले, गटनेते.....प्रकल्पाची पाहणी महापौर आणि पदाधिकाºयांनी केली. पावसाळा, वीज वाहिन्यांचे स्थलांतर, काम परवानगीस झालेला उशीर यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यात अडचण आली होती. कामगार दिनापर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.’’ - केशव लावंड, उपमहाव्यवस्थापक, बी. जी. शिर्के इन्फ्रा. 

टॅग्स :nigdiनिगडीTrafficवाहतूक कोंडीBJPभाजपा