शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

महापालिका गणेश फेस्टिव्हल : महोत्सवावरून रूसवे फुगवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 6:39 AM

महापौरांनी पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हलची घोषणा केल्यानंतर क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल दिवाळीपर्यंत राबविण्याची अजब योजना आखली आहे.

पिंपरी : महापौरांनी पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हलची घोषणा केल्यानंतर क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल दिवाळीपर्यंत राबविण्याची अजब योजना आखली आहे. ‘पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल हा मर्यादित दिवस चालणारा गणेश फेस्टिव्हल नाही. गणेशोत्सवात अनेक कलाकारांच्या वेळा मिळत नाहीत. त्यामुळे दिवाळीपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम ठेवता यावेत यासाठी फेस्टिव्हल दिवाळीपर्यंत सुरू राहील, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आर. एस. कुमार महापौर असताना १९९६ मध्ये पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हल सुरूकेला होता. या अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत होते. चार दिवस हा फेस्टिव्हल चालत होता.दरम्यान, गणेश फेस्टिव्हलच्या आयोजनावरून चढाओढ सुरू झाली. त्यामुळे प्रकाश रेवाळे यांनी महापौर असताना फेस्टिव्हल बंद केला. त्यानंतर एक वर्ष पिंपरी-चिंचवड उत्सव, सांस्कृतिक संस्था आणि पालिकेच्या सहकार्याने एक वर्ष गणेश फेस्टिव्हल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पिंपरी-चिंचवड सोशल क्लब यांच्या वतीने गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत होते. यावर्षीपासून महापौर नितीन काळजे यांनी या महोत्सवाचे पुनरुजीवन केले आहे. तर एक ते तीन सप्टेंबरला फेस्टिव्हल जाहीर केला आहे. मात्र, त्याची रूपरेषा अद्याप देखील ठरली नाही.लक्ष्मण सस्ते म्हणाले, पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल हा मर्यादीत दिवस चालणारा गणेश फेस्टिव्हल नाही. गणेशोत्सवात अनेक कलाकारांच्या वेळा मिळत नाही. त्यामुळे यंदा पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हलच्या ऐवजी पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल असे नाव दिले आहे. दिवाळीपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम ठेवता यावेत यासाठी पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल दिवाळीपर्यंत सुरू ठेवण्याचे नियोजन आहे.’’