महापालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: June 16, 2016 04:24 IST2016-06-16T04:24:13+5:302016-06-16T04:24:13+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१५) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली आहे. गोरखनाथ रमेश कुडे

महापालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या
चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१५) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली आहे. गोरखनाथ रमेश कुडे (वय ३९,रा. मंगलमूर्ती वाड्याजवळ, चिंचवडगाव) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखनाथ कुडे हे महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत होते. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास गावातील राहत्या घरात कुडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या का केली, याची माहिती समोर आली नसून, कारण अस्पष्ट असल्याचे चिंचवड पोलिसांनी सांगितले.
दरम्यान शहर परिसरामध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत परिसरातून चिंता व्यक्त होत आहे. या घटना रोखणासाठी समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे. (वार्ताहर)