महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
By Admin | Updated: October 20, 2015 03:11 IST2015-10-20T03:11:03+5:302015-10-20T03:11:03+5:30
महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस व ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
पिंपरी : महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस
व ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाबरोबर बोनस व सानुग्रह अनुदानाबाबत २०१३ साली त्रैवार्षिक करार झाला होता. त्यानुसार बोनस व सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. हा लाभ महापालिकेतील सर्व एक ते चार वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सात हजारपेक्षा अधिक कर्मचारी संख्या असून, या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जे कर्मचारी सहा महिने अथवा पूर्ण वर्षापर्यंत कामावर असतील, त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. नैमित्तिक कर्मचारी व प्रशिक्षणार्थींना याचा लाभ मिळणार नाही. दिवाळीपूर्वीच बोनस व सानुग्रहाची रक्कम कर्मचाऱ्यांना अदा केली जाणार आहे. या बोनसमुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(प्रतिनिधी)