पिंपरीत अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेकडून नऊ गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 21:04 IST2020-12-09T21:02:57+5:302020-12-09T21:04:25+5:30
अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे किंवा हटवावे, अशी नोटीस संबंधित अनधिकृत बांधकामधारकांना बजावण्यात आली.

पिंपरीत अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेकडून नऊ गुन्हे दाखल
पिंपरी : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. तत्पूर्वी अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे किंवा हटवावे, अशी नोटीस संबंधित अनधिकृत बांधकामधारकांना बजावण्यात आली आहे. मात्र त्यांनी अनधिकृत बांधकामे हटविली नाहीत. त्यामुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये मंगळवारी याप्रकरणी नऊ गुन्हे दाखल झाले.
मनोज पांडुरंग नवगिरे (रा. मोशी), सुनील बबन कुदळे (रा. मोशी) या दोघांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल बाबुराव शिंदे (वय ५१), विजय चुनीलाल शहा (वय ३५, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी), अजय मुरलीधर पिसाळ (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) या तिघांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संध्या मुरलीधर अंबुसकर (रा. वङमुखवाडी), वायकर दत्तात्रय त्रिंबक (रा. वडमुखवाडी), मुकेश तुकाराम देवकर (रा. वडमुखवाडी) शीतल नितीन पाटील (रा. वडमुखवाडी) या चौघांवर दिघी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपींची जागा रेडझोनमध्ये आहे. असे असतानाही आरोपींनी महापालिकेची परवानगी न घेता बांधकाम केले आहे.