शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शंभर पोलीस वर्ग झाल्याने चिखली पोलीस ठाण्याला मिळणार मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 16:20 IST

निगडी, सांगवी, चिंचवड पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षातून चिखली पोलीस ठाण्यासाठी एकूण १०० कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडून मागील आठवड्यात मोठा फेरबदल चिखली पोलीस ठाण्याला मंजुरी मिळून उलटले ६ महिने

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून चिखली पोलीस ठाण्यासाठी जादा पोलीस वर्ग करण्यात आले आहेत. निगडी, सांगवी, चिंचवड पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षातून चिखली पोलीस ठाण्यासाठी एकूण १०० कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने चिखली पोलीस ठाणे लवकरच कार्यरत होणार आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी काढले आहेत.चिखली पोलीस ठाण्यासाठी 5 सहा्यक फौजदार,२८ पोलीस हवालदार, २८ पोलीस नाईक, ४  महिला पोलीस नाईक, १९ पोलीस शिपाई, १६ महिला पोलीस शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  निगडी पोलीस ठाण्यातून ८१ , सांगवी पोलीस ठाण्यातून २ , चिंचवड पोलीस ठाण्यातून १ आणि नियंत्रण कक्षातून १६ असे पोलीस कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत.चिखली पोलीस ठाण्याला मंजुरी मिळून ६ महिने उलटले, मात्र जुलै २०१८ मध्ये निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे यांची बदली चिखली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बदली करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेच पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाल्याने या बदलावर फारसा परिणाम पडला नाही. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मागील आठवड्यात शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे कारभारी बदलून मोठा फेरबदल केला. यातच पिंपरी चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागात कार्यरत असलेले विवेक वसंत मुगळीकर यांची चिखली पोलीस ठाण्यात अंतर्गत बदली करण्यात आली. त्यानंतर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याने आता चिखली पोलीस ठाणे लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

टॅग्स :chikhali roadचिखली रोडPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेPuneपुणे