शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मावळातील भातपीक आले धोक्यात, शेतकरी हवालदिल, करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:05 IST

भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यातील अनेक भागातील भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भातपीक धोक्यात आले आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

करंजगाव : भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यातील अनेक भागातील भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भातपीक धोक्यात आले आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.मावळ तालुक्यात, तसेच नाणे मावळात घनदाट जंगल आहे. नाणे मावळ या भागात अथवा परिसरात अनेक छोटी-मोठी गावे असून, त्यांमध्ये जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी,भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडिवडे, नाणे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत व इतर वाड्या-वस्त्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतजमिनीमध्ये भात पिकाची लागवड केली आहे. यामध्ये विविध जातीच्या पिकांचा समावेश आहे.पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भातलागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मावळ तालुका हा भात पिकासाठी अग्रेसर आहे.मात्र, या परिसरातील भात पिकावर करपा रोग पडत आहे. या करपा रोगामुळे या परिसरातील भात पिकांचे शेंडे पिवळे पडले आहे. भातपीक करपले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पिकांचा विमा द्यावा, तसेच पीक कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. करपा रोगाचा पादुर्भाव वाढला आहे. भातावर मावळ तालुक्यात सर्वत्र जीवाणूजन्य करपा बॅक्टेरियल लीप ब्लाईट पडला आहे. रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉपर आॅक्सिक्लोराईड ३० ग्रॅम, स्टेप्टोसिलाईन ३ ग्राम, स्टिकर १५ मिली हे सर्व १५ लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी. तुडतुडे दिसत असतील, तर वरील इमॅडेक्लोप्राइड ३ मिली मिसळून फवारणी करावी, अशी माहिती कृषी सहायक एम. एम. शेख यांनी ‘लोकमत’ला दिली.एकीकडे कर्जमाफी होण्यासाठी शेतकरी बांधव कासावीस झाला असून, दुसरीकडे भात रोपावर करप्या रोग पडल्याने भातासाठी केलेला खर्चसुद्धा निघतो की नाही असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड म्हणाले.नाणे मावळ या भागात अपेक्षित पाऊस न पडल्याने भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. करपा रोगामुळे या परिसरातील भातपीक पिवळे पडू लागले आहे. पीक धोक्यात आल्याची माहिती कोंडिवडे गावचे शेतकरी तुकाराम चोपडे यांनी दिली.कृषी विभागामार्फत ज्या ठिकाणी करपा रोगाचा पादुर्भाव आहे. त्या ठिकाणी यांत्रिकीकरणाच्या साह्याने भात पिकावर फवारणी करण्यात यावी. जेणेकरून भात पिकांवर नियंत्रण राखता येईल, अशी माहिती लक्ष्मण टाकवे यांनी दिली.कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीची शेतकºयांना झळ पोचते. त्यासाठी प्रशासनानाने लवकरात लवकर पिकांचा विमा शेतकºयांना द्यावा. तसेच पीक कर्ज माफ करावे, अशी मागणी साबळेवाडीचे शेतकरी नाना साबळे यांनी केली आहे.ज्या ठिकाणी करया रोग भात पिकावर पडला आहे. त्या ठिकाणी वेळेत कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी गोवित्रीगावचे काशिनाथ जाधव यांनी केली आहे.शासनाने त्यांच्या महसूल खात्यामार्फत चौकशी करून मंडलाधिकारी, तलाठी यांच्या माध्यमातून जो करपा रोगाचा पादुर्भाव पडला आहे. त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून शासनास अहवाल सादर करावा व शेतकºयाला मदत करावी, अशी मागणी संदीप आंद्रे यांनी केली आहे.शेतक-यांनी चांगल्या प्रकारच्या भात पिकाची लागवड केली असूनदेखील रोग पडला आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. प्रशासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी साई गावचे नामदेव पिंगळे यांनी केली.कर्जमाफी होण्यासाठी शेतकरी बांधव आॅनलाइन अर्ज भरत आहे. अर्ज भरूनही कर्जमाफी होईल की नाही याबाबत शाश्वती नसताना दुसरीकडे भात पिकावर करपा रोग पडला आहे. या परिस्थितीने शेतकरी कासावीस झाला असल्याची व्यथा शेतकरी मधुकर गायकवाड पाटील यांनी मांडली.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे