पिंपरीत आंदोलन
By Admin | Updated: October 30, 2015 00:17 IST2015-10-30T00:17:34+5:302015-10-30T00:17:34+5:30
हरियाणातील दलित कुटुंबावर नुकत्याच झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कष्टकरी कामगार पंचायत आणि इतर पुरोगामी संघटनांनी पिंपरीमध्ये आंबेडकर पुतळ््यासमोर आंदोलन केले.

पिंपरीत आंदोलन
पिंपरी : हरियाणातील दलित कुटुंबावर नुकत्याच झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कष्टकरी कामगार पंचायत आणि इतर पुरोगामी संघटनांनी पिंपरीमध्ये आंबेडकर पुतळ््यासमोर आंदोलन केले.
सध्या देशभरात अल्पसंख्याक आणि दलित समाजावरील अन्याय-अत्याचार वाढत आहे. सरकारने कारवाई करण्याऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे दलितांवरच टीका करीत आहेत. तसेच या प्रकरणी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मत पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी या वेळी व्यक्त केले. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी केली आहे.
बाळासाहेब भागवत, अकिल मुजावर, मौलाना मकसद, अॅड. तारिक रिज्वी, मारुती कदम, संजना मोरे, शिवशंकर उबाळे, सुरेश निकाळजे, बाळासाहेब रोकडे, रफिक कुरेशी, प्रल्हाद कांबळे, रज्जाक सोलापुरी, इसाक राज, धर्मराज जगताप, बळीराम काकडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)