शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

शासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या तसेच आर्थिक मदत करावी; नाभिक समाजबांधवांकडून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:59 IST

केशकर्तनालये बंद असल्याने हातावर पोट असलेल्या नाभिक समाजबांधवांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्देकेशकर्तनालये सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणीशासन व प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध करून निषेध

पिंपरी : केशकर्तनालये सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी तसेच आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी नाभिक समाजबांधवांनी केली आहे. त्यासाठी चिखली येथील कृष्णानगर चौकात स्पाईन रस्त्यावर मंगळवारी (दि. ९) त्यांच्याकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथील करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने व्यवहार पूर्ववत करण्यात येत आहेत. त्यासाठी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र केशकर्तनालये, स्पा आदींना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नाभिक समाजबांधवांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे केशकर्तनालये सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. याबाबत पिंपरी-चिंचवडच्या अपर तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष समाधान गवळी, सेक्रेटरी अनंत पवार, कार्याध्यक्ष देवेंद्र जगताप, उपाध्यक्ष परमेश्वर शिंदे, खजीनदार सुनील बिडकर, मंडळाच्या दक्षता समितीचे अध्यक्ष जितेंद्र शर्मा, मंडळाचे पिंपरी-चिंचवड युवक अध्यक्ष पंकज व्यवहारे आदी या वेळी उपस्थित होते. चिखली येथील श्री संत सेनामहाराज नाभिक समाज मंडळाच्या वतीने कृष्णानगर येथे स्पाईन रस्त्यावर भाजी मंडई चौकात आंदोलन करण्यात आले. पीपीई किट परिधान करून हातात मागण्यांचे फलक धरून आंदोलन केले. या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. शासन व प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध करून निषेध करण्यात आला. केशकर्तनालये बंद असल्याने हातावर पोट असलेल्या नाभिक समाजबांधवांचे हाल होत आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट आहे. त्यासाठी शासनाने नाभिक समाजबांधवांना आर्थिक मदत करावी, तसेच केशकर्तनालये सुरू करण्यास त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.मंडळाचे अध्यक्ष समाधान गवळी या वेळी म्हणाले, ह्यह्यपिंपरी-चिंचवड शहरात साडेचार हजारावर व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून केशकर्तनालये सुरू झाल्यानंतर पुरेशी खबरदारी घेण्यात येईल. दोन खुर्च्यांमध्ये अंतर ठेवण्यात येईल, रुमाल तसेच इतर साहित्याचा एका ग्राहकासाठी एकदाच वापर केला जाईल. त्यासाठी ह्ययूज अँड थ्रोह्ण साहित्य वापरण्यात येईल. महाराष्ट्र नाभिक मंडळाकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. त्यानुसार आम्ही देखील आंदोलन केले आहे. शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी.ह्णह्ण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChikhliचिखलीState Governmentराज्य सरकारbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस