पिंपरी-चिंचवड (वाकड) : धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत येणारे रुग्णालये नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत रुग्णाला कुठलीही शासकीय सवलत व योजनेची माहिती न देता आर्थिक लूट करतात. त्यांच्या या गलथान व मनमानी कारभाराच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी धर्मादाय रुग्णालय संघर्ष समितीच्या वतीने थेरगाव येथील आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच धर्मादाय रुग्णालयासमोर दररोज एक दिवस असे आठवडाभर हे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाची सुरुवात गुरुवारी(दि.३०आॅगस्ट) थेरगाव येथील बिर्ला रुग्णालयापासून करण्यात आली. यावेळी काळ्या फिती लावून रुग्णालयाचा निषेध करीत घोषणा देत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या नावापुढे धर्मादाय रुग्णालय असा स्पष्ट उल्लेख असावा, रुग्णालयाच्या प्रवेश द्वाराजवळ स्वतंत्र कार्यालय आणि समाजसेवक २४ तास उपलब्ध असावा, निर्धन आर्थिक दुर्बल घटकासाठी व विविध शासकीय योजना, सेवा-सुविधा, आयपीएफ माहिती फलक दररोज स्पष्ट लिहावे, धमार्दाय योजनेतून लाभ घेण्यासाठी रुग्णाला आवश्यक कागदपत्रे पूर्तता नियम-अटी इत्यादीचे स्पष्ट फलक प्रवेशद्वारावर लावावेत, रुग्णाला उपचार सेवा सुविधा देणेकामी रुग्णालयाची अडचण समस्याव आजार याची स्पष्ट माहिती नातेवाईकांना लेखी द्यावी. अशा मागण्या या संघर्ष समितीच्या असल्याचे आंदोलक अजिज शेख यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयाच्या मनमानी विरोधात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 18:57 IST
गलथान व मनमानी कारभाराच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी धर्मादाय रुग्णालय संघर्ष समितीच्या वतीने थेरगाव येथील आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन सुरु आहे.
धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयाच्या मनमानी विरोधात धरणे आंदोलन
ठळक मुद्देशहरातील सर्वच धर्मादाय रुग्णालयासमोर दररोज एक दिवस असे आठवडाभर हे आंदोलन करण्यात येणार