वाहनचोरटे जेरबंद
By Admin | Updated: October 7, 2016 04:05 IST2016-10-07T04:05:59+5:302016-10-07T04:05:59+5:30
चिंचवड येथून चोरी झालेल्या दुचाकीचा तपास करीत असताना, पोलिसांना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पंढरपुरातील आरोपीकडे दुचाकी आणि चारचाकी वाहने

वाहनचोरटे जेरबंद
पिंपरी : चिंचवड येथून चोरी झालेल्या दुचाकीचा तपास करीत असताना, पोलिसांना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पंढरपुरातील आरोपीकडे दुचाकी आणि चारचाकी वाहने असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी विविध ठिकाणाहून दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली़
पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे १७ लाख ५० हजार किमतीची सहा वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत़ या प्रकरणी आरोपी उत्तम मुरलीधर भोसले (वय ४७, रा़ तुगंत, ता़ पंढरपूर, सोलापूर), शिवाजी पोपट शिंदे (वय ३४, रा़ बाभूळगाव, ता़ पंढरपूर), विजय लक्ष्मण आगवणे (वय ३८, रा़ पंढरपूर), नरेश उर्फ प्राजंल सुनील घनवट (ओटा स्कीम, निगडी) आरोपींच्या टोळीला अटक करण्यात आली आहे़
पंढरपुरातील आरोपी उत्तम भोसले आणि त्याच्या साथीदारांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणावरून दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरल्याची माहिती दिली़ पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडले़ चौकशीदरम्यान आरोपी उत्तम, शिवाजी, विजय, नरेश यांनी सांगली, राजगड, शिरवळ, देहूरोड, मोहोळ आणि इतर भागात वाहनचोऱ्या केल्याचे कबूल केले़ आरोपींकडून एकूण १७ लाख ५० हजारांची सहा वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत़
या कारवाईत शशिकांत शिंदे, अपर पोलीस आयुक्त आणि डॉ़ बसवराज तेली उपआयुक्त, राम मांडुरके, विवेक मुगळीकर, मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने यांचा सहभाग होता़ (प्रतिनिधी)