शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आई रागावल्याने मुलीने सोडले घर आणि पुढे घडले असे काही... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 20:24 IST

बुधवारी सकाळी काही कारणांवरून तिला तिच्या आईने रागवले. हा राग मनात धरून ती पाणी घेऊन येते, असे सांगून घराबाहेर पडली व थेट पुणे-लोणावळा लोकलमध्ये बसली.

कामशेत : आई रागावली म्हणून कुणालाही काही न सांगता रागात घराबाहेर पडलेली, एक १२ वर्षीय मुलगी पुणे ते मुंबई असा लोकलने प्रवास करताना एका वयोवृद्ध आजीस आढळली. त्या आजीने तिच्याशी संवाद साधत तिची समजूत काढून तिला आपल्याबरोबर कामशेतरेल्वे स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांकडे सोपवले. त्यामुळे मुलीची तिच्या आई-वडिलांशी पुन्हा भेट झाली. अनुराधा गाडे असे या मुलीचे नाव असून ही घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमार घडली.तळेगाव रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार ( दि. १९ ) रोजी अनुराधा ही मागील काही वर्षांपासून मुंबईमध्ये तिच्या आजीकडे राहत होती.दरम्यान, काही दिवसांपूर्वी ती पुण्यातील हडपसर भागात राहत असलेल्या तिच्या आईकडे आली होती. मात्र, बुधवारी सकाळी काही कारणांवरून तिला तिच्या आईने रागवले. हा राग मनात धरून ती पाणी घेऊन येते, असे सांगून घराबाहेर पडली व थेट पुणे-लोणावळा लोकलमध्ये बसली.यावेळी ती खूप भांबवलेली होती, तिच्याकडे मोबाइल देखील नव्हता. हे पाहून याच रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेने तिची चौकशी केली. तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्याने त्या महिलने तिला मी तुला बसमध्ये बसवून देते. तू रेल्वेने एकटी जाऊ नको असा सल्ला दिला. या महिलेवर विश्वास बसल्याने महिलेने तिला आपल्याबरोबर घेतले. कामशेत रेल्वेस्थानक आल्या नंतर येथे उतरून रेल्वे प्रशासन व रेल्वे अधिकाऱ्यांकडे मुलीला सोपवून आजी निघून गेली. तळेगाव लोहमार्ग महिला रेल्वे पोलीस कर्मचारी एस. मोहिते यांनी मुलीची सविस्तर माहिती घेत व तिच्या आई-वडिलांशी संपर्क साधुन तिला त्यांच्या स्वाधीन केलं. यावेळी पालकांनी पोलिसांचे व न भेटलेल्या आजीचे मनःपूर्वक आभार मानले.

टॅग्स :kamshetकामशेतrailwayरेल्वेPoliceपोलिस