शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोरया गोसावी देवस्थानला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा : खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 11:48 IST

पर्यटन मंत्री व ग्रामविकास मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद 

ठळक मुद्देचिंचवड येथील श्री मोरया गोसावी देवस्थानचा साडेचारशे वर्षांपूर्वीचा इतिहास

पिंपरी : साडेचारशे वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या चिंचवडगांवातील श्री मोरया गोसावी देवस्थानला  ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे लवकरच चिंचवड देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळेल, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला आहे. 

खासदार बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आणि चिंचवडगावातील स्थानिक नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची बुधवारी भेट घेतली. चिंचवड येथील श्री मोरया गोसावी देवस्थानचे महत्व दोनही मंत्र्यांना सांगत तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची विनंती केली. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, चिंचवड येथील श्री मोरया गोसावी देवस्थानचा साडेचारशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. देवस्थानाअंतर्गत अष्टविनायकांपैकी तीन अष्टविनायक क्षेत्र येतात. यात थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेक या अष्टविनायक क्षेत्रांचा समावेश आहे. अष्टविनायकाची यात्रा सुरु करताना किंवा शेवट करताना चिंचवड देवस्थानातील गणपतीच्या दर्शनाने केला जातो अशी आख्यायिका आहे. याला खूप मोठे महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीपासून छत्रपती संभाजी महाराजांनी संस्थानाला जमिनी दिल्या होत्या. या देवस्थानाला ऐतिहासिक महत्व आहे. लाखोंच्या संख्येने भाविक मंदिरात येतात.

दरवर्षी श्री मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सवाचे आयोजन केले जाते. गणेशचतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे तीर्थक्षेत्राला 'ब' दर्जा देण्यात यावा. हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर सरकारच्या पर्यटनाच्या आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्रात चिंचवड देवस्थानचा समावेश केला जाईल. त्यामुळे विकासकामांना चालना मिळेल. राज्य सरकारच्या पातळवीर महत्व प्राप्त होईल.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAaditya Thackerayआदित्य ठाकरेHasan Mushrifहसन मुश्रीफShiv Senaशिवसेना