शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचाऱ्यांना वेतनासह सानुग्रह अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 16:42 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रथा बोनस देण्याची पद्धत आहे. महापालिकेत साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेतील सर्व वर्ग १ ते ४ मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध लाभ घंटागाडी कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बक्षीस रक्कम दिली जाणार

पिंपरी : दिवाळी जवळ आली असून औद्योगिक नगरीतील विविध कंपन्यांनी बोनस जाहीर केले आहेत. महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. एक महिन्याच्या वेतनासह पंधरा हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे, या संदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लेखा विभागाला निर्देश दिले आहेत.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रथा बोनस देण्याची पद्धत आहे. महापालिकेत साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. तसेच बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संख्या सुमारे दीड हजार आहे. महापालिकेतील सर्व वर्ग १ ते ४ मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध लाभ दिले जातात. बोनस संदर्भात महापालिका आणि कर्मचारी महासंघात या संदभार्तील तीन वर्षांपूर्वी करार झालेला आहे. त्यानुसार ८.३३ टक्के बोनस आणि १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपुर्वी बोनस व सानुग्रह अनुदान देण्याची रक्कम देण्याची विनंती कर्मचारी महासंघाने महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार चर्चा करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे, कामगार कल्याण विभागाचे सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, महासंघाचे महासचिव चारुशिला जोशी, कार्याध्यक्ष मनोज माछरे, महाद्रंग वाघेरे, नितीन समगीर, दिगंबर चिंचवडे, विशाल भुजबळ, सुनिल विटकर उपस्थित होते. पाच हजारांनी बोनसमध्ये वाढमहापालिका कर्मचाऱ्यांबरोबरच घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी दिवाळीसाठी पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले होते. यावर्षी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदानात वाढ करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनाने ही मागणी मान्य करीत यावर्षी वाढ केली आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बक्षीस रक्कम दिली जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणेshravan hardikarश्रावण हर्डिकरEmployeeकर्मचारीDiwaliदिवाळी