पिंपरी : व्हाट्स अॅपवरून व्हिडिओ कॉल करून अश्लिल चाळे केले. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. ३) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाइलवर व्हाट्स अॅपवर एका आरोपीने अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल केला. फिर्यादी यांनी कॉल रिसिव्ह केला असता, आरोपी नग्नावस्थेत असल्याचे व्हिडिओ कॉलमधून दिसून आले. तसेच आरोपी याने त्याचा चेहरा लपवून ठेवून अश्लिल चाळे केले. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून आरोपी याने फिर्यादी यांचा विनयभंग केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत..............
व्हाट्स अॅपवरून व्हिडिओ कॉल करून विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 19:37 IST
फिर्यादी यांच्या मोबाइलवर व्हाट्स अॅपवर एका आरोपीने अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल
व्हाट्स अॅपवरून व्हिडिओ कॉल करून विनयभंग
ठळक मुद्दे ३१ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद