शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे रुपये देऊन अत्याचार; १२ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गरोदर

By नारायण बडगुजर | Updated: May 23, 2024 21:16 IST

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी १९ मे रोजी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पिंपरी : मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीला २०० रुपयांचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेले असता मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. निगडी येथे डिसेंबर २०२३ मध्ये हा प्रकार घडला.  

सुलतान शेख (३०, रा. निगडी ओटास्कीम), असे अटक केलेल्याचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी १९ मे रोजी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस आयुक्त राजू मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलतान शेख हा रिक्षा चालक आहे. ताे भाडेतत्त्वारील रिक्षा चालवतो. पीडित मुलगी तिच्या कुटुंबियांसह चिंचवड परिसरात वास्तव्यास आहे. पीडित मुलगी तिच्या निगडी येथील मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली असता सुलतान शेख याने रिक्षातून तिला घरी सोडण्याचा बहाणा केला. त्यातून तिच्याशी ओळख केली. त्यानंतर वेगवेगळ्या तीन ठिकाणी नेले. तिला २०० रुपये देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातून मुलगी गरोदर राहिली. दरम्यान तिला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेले. त्यावेळी ती सहा महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. 

न्यायालयीन कोठडीगुन्हा दाखल करून सुलतान शेख याला २० मे रोजी पोलिसांनी अटक केली. त्याला गुरुवारपर्यंत (दि. २३) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. 

पीडितेवर उपचार सुरू पीडित मुलीचे आईवडील मजुरी करतात. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तिला १७ वर्षांचा भाऊ असून तिच्यापेक्षा आणखी दोन लहान भावंडे आहेत. पीडितेला मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पोलिसांनी प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी पीडितेच्या नावाने बँकेत खाते काढण्यात येणार आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी