पिंपरी : देहूरोड येथील एका १२ वर्षीय मुलास अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. दुसऱ्या घटनेत एका मुलीस अज्ञात इसमाने सोमवारी रात्री दहाच्या सुमारास फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाची आई (वय २९, रा. दत्तनगर, देहूरोड, जि. पुणे) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच मुलीची आई (वय ४२, रा. देहूरोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पहिल्या घटनेत संबंधित महिलेच्या मुलास सोमवारी रात्री आठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे. तसेच दुसऱ्या घटनेत संबंधित मुलीस कोणीतरी फूस लावून पळवून नेले आहे. पळवून नेणाऱ्याचे नाव अद्याप निष्पन्न झालेले नसून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत पोलिसांनीअपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करीत आहेत.
देहूरोडमधून अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 13:24 IST