शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून खून करणाऱ्यांच्या ४८ तासात आवळल्या मुसक्या; ७ जणांना अटक

By प्रकाश गायकर | Updated: July 5, 2024 19:07 IST

खून केल्यानंतर फरार झालेल्या संशयित आरोपींना म्हाळुंगे पोलिसांनी ४८ तासांत अटक केली

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून दुचाकीवरून जाणाऱ्या एकावर कोयत्याने वार करत निर्घुन खून केला. त्यानंतर हल्ला करून रिक्षामधून आरोपी फरार झाले. ही घटना १ जुलैला सायंकाळी सात वाजता म्हाळुंगे येथे घडली. खून केल्यानंतर फरार झालेल्या संशयित आरोपींना म्हाळुंगे पोलिसांनी ४८ तासांत अटक केली.

विशाल पांडुरंग तुळवे (वय ३७, रा. खालुंब्रे), मयुर अशोक पवार (३०, तळेगाव दाभाडे), रणजित बाळू ओव्हाळ (२२, खालुंब्रे), प्रथम सुरेश दिवे (२१, म्हाळुंगे), विकास पांडुरंग तुळवे, चंद्रकांत भिमराव तुळवे व सनी रामदास तुळवे (सर्व रा. खालुब्रे) यांना पोलिसांनीअटक केली आहे. गणेश अनिल उर्फ आण्णा तुळवे (वय ३०) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलैला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मयत गणेश तुळवे हे त्यांचा भाचा प्रणय प्रदिप तुळवे यांच्या सोबत दुचाकीवरून म्हाळुंगे वरून खालुंब्रेकडे जात होते. एच पी चौकाजवळ दबा धरून बसलेल्या विशाल तुळवे व त्याच्या साथीदारांनी गणेश यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर पाठीमागील बाजूस कोयत्याने वार करत त्यांचा निर्घुण खून केला. त्यांना सोडवण्यासाठी मध्ये येणारा त्यांचा भाचा प्रणय याच्यावर देखील कोयत्याने वार केले. त्यानंतर सर्व संशयित आरोपी रिक्षामधून फरार झाले.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, चाकण विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी गुन्ह्याच्या तपासासंदर्भात सूचना केल्या. त्यानुसार, म्हाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांनी तीन पथके रवाना केली. खून करून फरार झालेले संशयित लोणावळा मार्गे मुंबई येथे गेल्याबाबत तांत्रिक तपासात उघड झाले होते. मात्र, पोलिस तेथे पोहचेपर्यंत संशयित तेथून फरार झाले. त्यानंतर ते मावळ येथील जांबवडे गावामध्ये एका घरात लपून बसले असल्याचे पोलिस हवालदार तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे यांना माहित झाले. त्याआधारे नितीन गिते यांनी शोध पथकाच्या मदतीने सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना पाठवून संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकChakanचाकण