शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

निगडीपर्यंत मेट्रोचा प्रकल्प आराखडा; महामेट्रोने अंमलबजावणीसाठी टाकले सकारात्मक पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 5:18 AM

महापालिकेतील सत्ताधारी, विरोधक, सामाजिक संस्था, संघटना यांच्या प्रयत्नाला यश येणार आहे. पुणे महामेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार असून, निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास पालिकेने महामेट्रो रेल कॉर्पोरेशनला सांगितले आहे.

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी, विरोधक, सामाजिक संस्था, संघटना यांच्या प्रयत्नाला यश येणार आहे. पुणे महामेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार असून, निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास पालिकेने महामेट्रो रेल कॉर्पोरेशनला सांगितले आहे. निगडीपर्यंत मेट्रोसाठी सकारात्मक असल्याचे मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाºयांनी माध्यमांना सांगितले.शहराची वाटचाल मेट्रो सिटीकडे सुरू आहे. केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता महापालिका निवडणुकीपूर्वी गेल्या वर्षी पुणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली होती. पुणे महामेट्रोच्या वतीने हे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास मान्यता दिली होती. परंतु, पिंपरी ते निगडी या मार्गात अधिक अडचणी असल्याने अंतिम विकास आराखड्यामध्ये निगडीपर्यंतच्या मेट्रोचा समावेश झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोची पायाभरणी केल्यानंतर १० महिन्यांत शहरातील महामेट्रोने दापोडी ते पिंपरी या सव्वासात किलोमीटर अंतरादरम्यानचे काम वेगात सुरू केले.सर्वपक्षीय प्रयत्नांना यशपुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, यासाठी सत्ताधाºयांबरोबरच विरोधी पक्ष, विविध सामाजिक संस्थांनी आवाज उठविला होता. मानवी साखळीही उभारली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील समग्र वाहतुकीच्या सोयीचा विचार करता व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता पुणे मेट्रोच्या पहिल्याच टप्प्यात निगडी-पिंपरी व पिंपरी-स्वारगेट या प्रकल्पाची सुरुवात करावी, अशी मागणी झाली. त्यानंतर सत्ताधाºयांनीमेट्रोचा खर्च करू, अशी तयारी दर्शविली होती. खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार यांनीही जोरदार मागणी केली होती. महापालिका जर खर्च करण्यास तयार असेल तर केंद्राच्या नगरविकास खात्यानेही हिरवा कंदील दाखविला होता.वाढीव निधीची आव्हानमेट्रो निगडीपर्यंत नेण्यास महापालिकेचा खर्च नको. महापालिका, राज्य आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे खासदार, आमदारांनी मेट्रोला निधी मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे. महापालिकेचा निधी वापरणार असतील, तर मेट्रोला विरोधअसेल, अशीही भूमिका काहीसंस्थांनी घेतली आहे. त्यामुळे केंद्राकडून निधी आणण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर आहे.निगडी मध्यवर्ती केंद्रउद्योगनगरीत चिंचवड, आकुर्डी या भागात मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. मुंबईहून-पुण्याला जाताना निगडी हे शहराचे प्रवेशद्वार आहे. यामुळे, तसेच पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शहर वसले आहे. त्यामुळे चिंचवड, आकुर्डी, पिंपरी या परिसरातील बस आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी असते. पीएमपीचा निगडीत मुख्य बस डेपो आहे. त्यामुळे खºया अर्थाने निगडीपर्यंत मेट्रोची आवश्यकता आहे. पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचा शहरवासीयांना काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची मागणी जोर धरत आहे.कासारवाडी ते मोशीही नवा मार्गनिगडीपर्यंतच्या मेट्रोचा खर्च महापालिका पेलणार आहे. मेट्रोने देखील पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची तयारी दर्शविली आहे. याला मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार आहे. महापालिकेतील सत्ताधाºयांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर डीपीआर बनविण्याचे काम वेगात सुरू आहे. तसेच निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या खर्चाचा भार पेलण्यास पालिका सक्षम असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खर्च करण्यास महापालिका तयार असल्याने मेट्रोनेही यास दुजोरा दिला आहे, तर कासारवाडी ते मोशी या मार्गाचाही डीपीआर करावा, अशा सूचना लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनास केल्या आहेत.मेट्रोचा भार पालिकेवर नकोपिंपरी : पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेणे आवश्यक आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्यास आमचा विरोध नाही. परंतु, यासाठी पिंपरी-चिंचवडकरांना कसलाही आर्थिक भुर्दंड पडला नाही पाहिजे. कारण, दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपा सत्तेत असून, त्यांना निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी निधी खेचून आणणे गरजेचे आहे. खासदार, आमदारांनी निधी खेचून आणावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. याबाबत महापौर नितीन काळजे यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर म्हणाले, ‘‘पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी यासाठी विरोधी पक्ष, विविध सामाजिक संस्थांनी आक्रमक होत आंदोलन सुरू केले.पिंपरी-चिंचवड शहराचा समग्र वाहतुकीच्या सोईचा विचार करता व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता पुणे मेट्रोच्या पहिल्याच टप्प्यात निगडी-पिंपरी व पिंपरी-स्वारगेट या प्रकल्पाची सुरुवात करावी. चिंचवड, आकुर्डी या भागात मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत, तर निगडी हे शहराचे प्रवेशद्वार आहे. यामुळे चिंचवड, आकुर्डी, निगडी या परिसरात नागरिकांचा जास्त राबता असतो. पीएमपीचा निगडीत मुख्य बस डेपो आहे. महत्त्वाच्या वेळी निगडी डेपोतून सुटणाºया बस खचाखच भरलेल्या असतात. त्यामुळे खºया अर्थाने निगडीपर्यंत मेट्रोची आवश्यकता आहे.पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचा शहरवासीयांना काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची मागणी वाढली. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला केल्या. आता डीपीआर बनविण्याचे काम वेगात सुरू आहे. तसेच निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या खर्चाचा भार पेलण्यास पालिका सक्षम असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, याचा आर्थिक भार पालिकेवर पडला नाही पाहिजे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपा सत्तेत असून, त्यांना निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी निधी खेचून आणणे गरजेचे आहे.’’

टॅग्स :Metroमेट्रो