मुख्यमंत्र्यांची आज पिंपरीत सभा

By Admin | Updated: February 18, 2017 03:23 IST2017-02-18T03:23:24+5:302017-02-18T03:23:24+5:30

महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा गाजू लागल्या

Meeting of the Chief Minister today in the Pimp | मुख्यमंत्र्यांची आज पिंपरीत सभा

मुख्यमंत्र्यांची आज पिंपरीत सभा

पिंपरी : महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा गाजू लागल्या आहेत. सभांचा फड रंगविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दीड वाजता पिंपरीत सभा होणार आहे. त्यांतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची सभा होणार आहे. दोन्ही नेते काय बोलणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. राज्य आणि देश पातळीवरील नेते सभा आणि प्रचारासाठी येत आहेत. स्टार प्रचारकांच्या सभांना रंगत आली आहे. शनिवारी दुपारी दीडला पिंपरी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा
चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होणार आहे. तसेच रविवारी शरद पवार यांची भोसरीत सभा होणार आहे.  (प्रतिनिधी)

Web Title: Meeting of the Chief Minister today in the Pimp