शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सत्ता स्थापनेच्या गोंधळात महापौर आरक्षणाची सोडत रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 14:00 IST

राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर व उपमहापौर यांना तीन महिन्यांची दिलेली मुदतवाढ संपत आली आहे

ठळक मुद्देइच्छुकांच्या वाट्याला प्रतीक्षा : पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता 

पिंपरी : राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर व उपमहापौर यांना तीन महिन्यांची दिलेली मुदतवाढ संपत आली आहे. मात्र, राज्यात सत्ता स्थापनेचा गोंधळ सुरू असल्यामुळे महापौर आरक्षण सोडत रखडली आहे. त्यामुळे विद्यमान महापौर व उपमहापौर यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुका होऊन १५ दिवस झालेतकरी राज्यातील सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शहराचे विद्यमान महापौर राहुल जाधव व उपमहापौर सचिन चिंचवडे यांना आणखी काही काळ मुदतवाढ मिळण्याची आशा आहे. पिंपरी महापालिकेतील ओबीसी आरक्षणानुसार अडीच वर्षाच्या कार्यकालानुसार महापौर नितीन काळजे व राहुल जाधव यांना संधी मिळाली. ओबीसी आरक्षण असलेल्या महापौरांचा कार्यकाल आॅगस्ट महिन्यात संपुष्टात आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापौर बदल नको, म्हणून सरकारने तो पुढे ढकलला. राज्य शासनाने २२ आॅगस्ट २०१९ रोजी काढलेल्या आदेशानुसार त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. ही मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत आहे. निवडणूक कार्यक्रमासाठी मुदतीपूर्वी पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. दरम्यानच्या काळात महापालिका प्रशासनाने निवडणूक कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. परंतु, अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. नगरविकासविभागाकडून पुढील महापौरपदासाठी आरक्षण सोडत झाल्याशिवाय निवडणूक कार्यक्रम निश्चित केला जाणार नाही. तर, नवीन सरकार स्थापनेचा पेच सुटल्याशिवाय आरक्षण सोडत काढली जाणार नाही. .........निवडणूक कार्यक्रम निश्चित नाहीनगरविकास विभागाकडून पुढील महापौरपदासाठी आरक्षण सोडत झाल्याशिवाय निवडणूक कार्यक्रम निश्चित केला जाणार नाही. तर, नवीन सरकार स्थापनेचा पेच सुटल्याशिवाय आरक्षण सोडत काढली जाणार नाही. त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे इच्छुकांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र, विद्यमान पदाधिकाºयांना आणखी काही दिवस कामाची संधी आहे..........विद्यमान महापौर यांना अभय ४महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार नवीन महापौर, उपमहापौर निवड होईपर्यंत विद्यमान पदाधिकारी पदावर राहतील. राज्यात सत्ता स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे महापौर पदाचे नवीन आरक्षण सोडत झालेली नाही. आरक्षण सोडत झाल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबविता येणार नाही. त्यामुळे आणखी काही दिवस विद्यमान महापौर राहुल जाधव यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाMayorमहापौर