शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मावळ हादरले : गर्भपातादरम्यान विवाहिता दगावली, नदीत फेकले; रडणाऱ्या दोन चिमुरड्यांनाही पाण्यात ढकलून दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 06:47 IST

दोघांना अटक; अनैतिक संबंधांतून घडलेला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी (पुणे) : अनैतिक संबंधातून गरोदर राहिलेल्या विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. त्यानंतर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन लहान मुलांनाही नदीत जिवंत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मावळ तालुक्यातील या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. समरीन निसार नेवरेकर (२५, रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ), इशान (५), इजान (२) अशी मृतांची नावे आहेत.

याप्रकरणी गजेंद्र दगडखैर (३७, मावळ), रविकांत गायकवाड (४१, अहमदनगर), मदत करणारी एजंट महिला, कळंबोली (नवी मुंबई) येथील अमर हाॅस्पिटलमधील संबंधित डाॅक्टर व मदत करणाऱ्या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. समरीन ही बेपत्ता असल्याची तक्रार पाेलिसांत आली होती. पाेलिसांना तिचे घराजवळ राहणाऱ्या गजेंद्र याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे आढळले हाेते.

पाेलिसी खाक्या दाखवताच सत्य आले समाेर...गजेंद्रला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. समरीन गरोदर राहिली. त्यामुळे तिचा गर्भपात करण्यासाठी गजेंद्रने तिला रविकांत गायकवाड या मित्रासोबत कळंबोली येथे पाठविले. तेथे अमर हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर गायकवाडने तिचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहासह तिच्या दोन्ही मुलांना घेऊन तो परत गजेंद्रकडे आला. ९ जुलै रोजी पहाटे दोघांनी समरीनचा मृतदेह इंदोरी गावातील इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिला. हा प्रकार पाहून समरीनची दोन्ही लहान मुले आरडाओरडा करून लागली. दोन्ही मुले रडू लागल्यामुळे त्यांनाही जिवंतपणे नदीत टाकून देण्यात आले. याप्रकरणी तळेगाव गजेंद्र दगडखैर व रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी