चाकण : जिवे मारण्याची धमकी देत खेड तालुक्यातील धामणगाव येथे २२ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्यात आला. ही घटना रविवारी (३0 जुलै) घडली. त्याच गावातील सुरेश दुलाजी मेदगे असे आरोपीचे नाव आहे.खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला पती, मुलगा व सासू-सासरे एकत्र कुटुंबात धामणगाव येथे आराळावस्तीत राहतात. मोलमजुरी करून पोट भरतात. रविवारी ती नेहमी प्रमाणे एकलहरे येथील बांगरवाडी येथे पॉलीहाऊसमध्ये कामास गेली होती. दिवसभर काम करून संध्याकाळी ६ वाजता आराळावस्ती येथे घरी एकटीच जात होती. दरम्यान, त्यांच वस्तीवरील आरोपी सुरेश दुलाजी मेदगे याने पाठीमागून येऊन पकडले. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला.या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केलीस, तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन आरोपी निघून गेला. पीडित महिलेने घाबरलेल्या अवस्थेत घरी जाऊन सासू, सासरे व पती यांना घडलेला प्रकार सांगितला. महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
धामणगाव येथे विवाहितेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:54 IST