शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

भूमकर चौक येथे ऑईल गळती ; तरुणांच्या तत्परतेने टळले अनेकांचे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 6:51 PM

ऑईल सांडल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून याठिकाणी अपघात झाले...

थेरगाव :  डांगेचोक कडून हिंजवडी कडे जाणाऱ्या मार्गावर भूमकर चौक येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाली होती. त्यामुळे पूर्ण ऑईल रस्त्याच्या मध्ये पसरल्यामुळे जवळपास ३०-३५ वाहने घसरून अपघात झाले. मात्र, त्यानंतर थेरगाव मधील काही तरुणांच्या तत्परतेमुळे अनेक अपघात टळले.ऑईल सांडल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून याठिकाणी अपघात झाले. अनेकांना शारीरिक दुखापत झाली. यावेळी तेथून जाणारे सजग नागरिक अभिजीत जाधव यांनी ही घटना पहिली व थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सदस्यांना दूरध्वनीद्वारे कळविली. सदस्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला. त्यामुळे कसलाही विलंब न करता अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन ऑईल सांडलेल्या ठिकाणी पाणी मारून रास्ता साफ केला.घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी येईल पर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी थेरगाव सोशल फाउंडेशनचे अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, राहुल जाधव, अंकुश कुदळे, श्रीकांत धावारे, अभिजीत जाधव यांनी वाहतूक वळवली व त्या ठिकाणी कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घेतली . या ठिकाणी कार्यरत असलेले वाहतूक पोलीस यांनी मौलाचे सहकार्य केले. भूमकर चौक हा शहरातील महत्वाचा मार्ग आहे. एक रस्ता शहरीकरणाकडे तर दुसरा रस्ता औद्योगिकरणाकडे जात असल्याने या ठिकाणी दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ चालू असते. अग्निशामक दलाने वेळेत येऊन सांडलेले आॅइल साफ केल्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

टॅग्स :ThergaonथेरगावAccidentअपघात