अमली पदार्थ बाळगला; दोघांना अटक व कोठडी
By Admin | Updated: September 18, 2014 23:58 IST2014-09-18T23:58:44+5:302014-09-18T23:58:44+5:30
विक्रीसाठी साडेसात लाख रुपयांचा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे.

अमली पदार्थ बाळगला; दोघांना अटक व कोठडी
पुणो : विक्रीसाठी साडेसात लाख रुपयांचा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी त्यांना 22 सप्टेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावली.
अब्दुल समसुल वहाबहक (वय 28, रा. बारामती, मूळ रा. पश्चिम बंगाल) आणि सर्फराज बाबालाल वारगीर (वय 32, रा. बारामती, मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस नाईक राकेश गुजर यांनी फिर्याद दिली आहे.
अटक आरोपी हे खराडी येथील वनाई गार्डन या हॉटेलजवळ अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून तेथे छापा टाकला असता दोघे आरोपी आढळून आले. त्यांच्याकडून 5क्5 ग्रॅम वजनाची ब्राऊन शुगर जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत तब्बल 7 लाख 57 हजार रुपये होते. बारामती येथील मोहंमद कमल या आरोपीकडून हा अमली पदार्थ आणल्याची माहिती आरोपींनी दिली आहे.
गुन्ह्यातील तिसरा आरोपी मोहंमद कमल याचा तपास करण्यासाठी आणि त्यांचा दहशतवादी कारवायांशी संबंध आहे का, याचा तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची सरकारी वकील वामन कोळी यांनी मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.(प्रतिनिधी)