नालेसफाई लवकर करा : आयुक्त
By Admin | Updated: June 15, 2016 05:00 IST2016-06-15T05:00:02+5:302016-06-15T05:00:02+5:30
शहरातील नालेसफाईची कामे दोन दिवसांत पूर्ण करावीत. त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असा आदेश महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना दिला आहे.

नालेसफाई लवकर करा : आयुक्त
पिंपरी : शहरातील नालेसफाईची कामे दोन दिवसांत पूर्ण करावीत. त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असा आदेश महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना दिला आहे. वेळेत नालेसफाई पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकारी, ठेकेदारावर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त वाघमारे यांनी मंगळवारी विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीस सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक आहेत. त्या दृष्टीने महापालिकेकडून तयारी सुरू आहे.