शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर, घटलेला कोणाच्या मुळावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 13:37 IST

Pimpri election 2019 : वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार आणि घटलेला टक्का कोणाच्या मुळावर उठणार याबाबतची चर्चा रंगली आहे. 

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : निकालाची उत्सुकता; लागल्या पैजा; सट्टाबाजार बेटिंग

पिंपरी : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी चोवीस तासांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोणाला आघाडी मिळणार? कोण निवडून येणार तर कोणाचा पत्ता कट होणार याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. चिंचवड विधानसभेतील मतदानाचा टक्का २.६५ टक्क्यांनी, भोसरीचा अडीच टक्क््यांनी घसरला आहे. तर मावळ आणि पिंपरीचा टक्का वाढला आहे. वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार आणि घटलेला टक्का कोणाच्या मुळावर उठणार याबाबतची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी झाले. पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ या चार मतदारसंघातील ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. चिंचवडमध्ये ४३९, भोसरीत ४११, पिंपरीत ३९९ आणि मावळमधील ३७० अशा एकूण १६१९ मतदान केंद्रांवर चांगले मतदान झाले. मतदारांचा उत्साह पाहण्याजोगा होता. उच्चशिक्षित आणि नवमतदारही अधिक प्रमाणावर दिसून येत होता. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांची टक्केवारी काहीशी कमी झाली आहे. .....चिंचवडमध्ये ११ उमेदवार रिंगणात होते़ गेल्यावेळी ४ लाख ८२ हजार ३६२ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यापैकी १ लाख ४८ हजार ७०४ पुरुषांनी तर १ लाख २३ हजार १६३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ५६.०३ टक्के मतदान झाले होते. तर या वेळी ५ लाख १८ हजार ३०९ मतदारांपैकी २ लाख ७६ हजार २९७ पुरुष तर १ लाख ५३ हजार ९९५ महिला मतदार अशा ५३.३८ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच २.६५ टक्के मतदान कमी झाले आहे. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप विरुद्ध सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी लढत होती. घटलेल्या पावणे तीन टक्के मताचा कोणाला फटका बसणार किंवा  फायदा होणार हे गुरुवारी समजेल.......भोसरीत घटले अडीच टक्के मतदानभोसरी विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे अशी लढत आहे. गेल्यावेळी ३ लाख ६३ हजार ५५३ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यापैकी १ लाख २४ हजार १६२ पुरुषांनी तर ९६ हजार ७८६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ६०.९२ टक्के मतदान झाले होते. तर या वेळी ४ लाख ४१ हजार १२५ मतदारांपैकी १ लाख ४५ हजार १८१ पुरुष तर १ लाख १३ हजार ५३५ महिला मतदार अशा ५८.६५ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच २.२७ टक्के मतदान कमी झाले आहे. कमी मताचा फटका कोणास बसणार याबाबत चर्चा आहे.......पिंपरीमध्ये उच्च शिक्षितांच्या कौलाकडे लक्षपिंपरी विधानसभेत एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. पिंपरीत आमदार गौतम चाबुकस्वार विरुद्ध राष्टÑवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे अशी लढत होती. गेल्यावेळी ३ लाख ८२ हजार ७१८ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यापैकी ९७ हजार ५८४ पुरुषांनी तर ७९ हजार ०८३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ४६.२३ टक्के मतदान झाले होते. तर या वेळी ३ लाख ५३ हजार ५४५ मतदारांपैकी ९७ हजार ०८३ पुरुष तर ८० हजार ३०१ महिला मतदार अशा ५०.१७ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच ३.९४ टक्के मतदान वाढले आहे. वाढीव टक्क्यांचा कोणास फायदा होणार? याबाबत उत्सुकता आहे.मावळ विधानसभेमध्ये होणार चुरस४मावळ विधानसभा मतदारसंघात ७ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी भाजपाकडून राज्यमंत्री बाळा भेगडे, राष्टÑवादीकडून सुनील शेळके अशी लढत आहे.  गेल्यावेळी २ लाख ९२ हजार ८९८ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यापैकी १ लाख १२ हजार ९१२ पुरुषांनी तर ९५ हजार १४५ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ७१.०२ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी ३ लाख ४८ हजार ४६२ मतदारांपैकी १ लाख ३१ हजार ४०६ पुरुष तर १ लाख १६ हजार ५५४ महिला मतदार अशा ७१.०९ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच ०.०२ टक्के मतदान कमी झाले आहे. ........२०१४ टक्केवारी        पुरुष    महिला    टक्केवारीचिंचवड    १,४८,७०४    १,२३,१६३    ५६.०३    पिंपरी    ९७,५८४    ७९,०८३    ४६.२३भोसरी    १,२४,१६२    ९६,७८६    ६०.९२मावळ    १,१२,९१२    ९५,१८३    ७१.०२..........२०१९ टक्केवारी        पुरुष    महिला    टक्केवारी    वाढ/घटचिंचवड    १,५३,९५५    १,२२,७१२    ५३.३८    २.६५ घटपिंपरी    ९७,०८३    ८०,३०१    ५०.१७    ३.९४ वाढभोसरी    १,४५,१८१    १,१३५३५    ५८.६५    २.२७ घटमावळ    १,३१,४०६    १,१६,५५४    ७१.१६         ०.१४ वाढ..........     

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानbhosari-acभोसरीpimpri-acपिंपरीmaval-acमावळ