शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : पिंपरीत युतीला पराभूत करण्यासाठीच आघाडीतर्फे पुरस्कृत उमेदवार : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 18:58 IST

१७५ आमदार निवडून येण्याची व्यक्त केली खात्री

पिंपरी : भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी आघाडीतर्फे काही उमेदवारांना पुरस्कृत केले तर काही अपक्षांना पाठिंबा दिला आहे. निवडून येणे हे एकच ध्येय असून, आघाडीचे १७५ आमदार निवडून येतील, अशी खात्री असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे राष्ट्रवादीची बुधवारी बैठक झाली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.पवार म्हणाले, पिंपरीसह काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागले. भोसरी व चिंचवड मतदारसंघात आमचे उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी संपली, अशी चर्चा झाली. मात्र असे नाही. चिंचवड मतदारसंघात आमच्या उमेदवाराचा ए व बी फॉर्म वेळेत पोहचू शकला नाही. त्यामुळे उमेदवाराला माघार घ्यायला सांगून अपक्षाला आघाडीतर्फे पाठिंबा दिला आहे. भोसरी मतदारसंघातही पुरस्कृत उमेदवार दिला आहे. निवडून आल्यानंतर या उमेदवारांनी आघाडीसोबत रहावे, असे त्यांना सांगण्यात आले असून, त्यांनी ते मान्य केले आहे. भोसरी, पिंपरी व चिंचवड या मतदारसंघात मनसेचा उमेदवार नाही. त्यामुळे त्यांनीही या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती मनसेला करण्यात आली आहे. 

'मी पवारसाहेबांच्या बाहेर नाही'...मी पवारसाहेबांच्या बाहेर नाही, पिंपरी-चिंचवडमधील उमेदवारांबाबत पक्षातील वरिष्ठांशी चर्चा केली. येथील निवडणूक चुरशीची व्हावी व निवडून येणे हेच ध्येय असल्याने उमेदवार बदलणे, पुरस्कृत करणे तसेच पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतले. काँग्रेसच्या भूमिकेबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलू. आमच्यात वाद नाही. पक्षातील सर्वांची नाराजी काढण्यासाठीच मी समक्ष येथे आलो आहे, असे अजित पवार म्हणाले.

''मी रडणारा, पळणारा माणूस नाही''राज्य सहकारी बँकेत माझे नाव आहे, त्यामुळे शरद पवार यांचे नाव त्यात गोवण्यात आले. याचे मला दु:ख आहे. त्यातूनच मी भावनिक झालो. मात्र मी स्व:ताला सावरले. मी रडणारा, पळणारा माणूस नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

' चंपा'ला पवारांशिवाय काही दिसत नाही...चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील यांना पवारांशिवाय काही दिसत नाही. त्यामुळे शरद पवार व आमच्यावर सतत टीका करतात. उद्धव ठाकरे यांचेही तसेच आहे. त्यांनाही राष्ट्रवादीशिवाय काय दिसणार? पाच वर्षे सत्तेत राहूनही त्यांनी आश्वासनांची पूर्ती केली नाही, असे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण