शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

पुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 13:33 IST

Pune Vidhan Sabha Election 2019 : पाऊस असताना असतानाही मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देचिंचवडमधील 439, भोसरीतील 411, पिंपरीतील 399 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरूभोसरी मतदारसंघातील सात व्हीव्हीपॅट मशीन बदलल्यामावळ तालुक्यात सकाळच्या सत्रात 18.83 टक्के मतदान 

पिंपरी : विधानसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया  सॊमवारी सुरू झाली असून सकाळी सात वाजल्यापासून पिंपरी, चिंचवड मावळ आणि भोसरी मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी सात ते नऊ या वेळात चिंचवडमध्ये 6.6 , भोसरीत 5.11, पिंपरीत टक्के मतदान झाले आहे. पाऊस असताना असतानाही मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीतील अंतिम टप्पा मतदान होत असून चिंचवडमधील 439, भोसरीतील 411, पिंपरीतील 399 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होती की काय असे चिन्ह होते. मात्र, पहिल्या टप्प्यामध्ये हे चांगले मतदान झाले आहे.  चिंचवड मतदार संघातील वाकड परीसरातील गुड सॅम रिटर्न शाळेचे मतदान केंद्र वगळता बहुतेक मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसली. भूमकर वस्ती शाळेत सकाळी साडे नऊपर्यंत रांगा लावून मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला मात्र नंतर ही गर्दी ओसरली. वाकड पिंक सिटी रस्त्यावरील इंफ्रंट जिजस शाळेत खोली क्रमांक ४ मधील ईव्ही पॅड मशीन बंद पडले होते पोलिंग एजंटनी हरकत घेतल्याने दुसरे मशीन जोडण्यात आले. बहुतेक आयटी कंपन्यांना दुपार नंतर सुट्टी असल्याने आयटी मतदारांची सध्या तरी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

पिंपरी मतदारसंघ मतदान टक्केवारी पुरूष एकूण मतदार - १८५९३९महिला एकूण मतदार - १६७६००तृतीयपंथी एकूण मतदार - ६एकूण मतदार - ३५३५४५

झालेले मतदान पहिला टप्पा - ७ ते ९पुरूष मतदार - ९०६१महिला मतदार - ४९१०तृतीयपंथी मतदार -   ---एकूण मतदान - १३९७१मतदान टक्केवारी - ४.०१ 

झालेले मतदान दुसरा टप्पा - ९ ते ११पुरूष मतदार - २५८८७महिला मतदार - १५८८४तृतीयपंथी मतदार - ०३एकूण मतदान - ४१३७४मतदान टक्केवारी - ११.७०

भोसरी मतदारसंघ मतदान टक्केवारी पुरूष एकूण मतदार - २,४१,५९७महिला एकूण मतदार - १,९९,४९७तृतीयपंथी एकूण मतदार - ११एकूण मतदार - ४,४१,१२५

झालेले मतदान पहिला टप्पा - ७ ते ९पुरूष मतदार - १५,२१८महिला मतदार - ७,३१०तृतीयपंथी मतदार -   ००एकूण मतदान - २२,५२८मतदान टक्केवारी - ५.११

झालेले मतदान दुसरा टप्पा - ९ ते ११पुरूष मतदार - ४२,४५६महिला मतदार - २४,२०३तृतीयपंथी मतदार - ०१एकूण मतदान - ६६,६६०मतदान टक्केवारी - १५.११

मावळ तालुक्यात सकाळच्या सत्रात 18.83 टक्के मतदान 

 लोणावळा : अतिशय चुरशीची व अटितटीची लढत असलेल्या मावळ तालुक्यात सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यत 18.83 टक्के मतदान झाले. मावळ तालुक्यात 3 लाख 48 हजार 462 मतदार आहेत यापैकी 65 हजार 631 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गावोगावी उत्सपुर्तपणे मतदार मतदानाकरिता घराबाहेर पडत आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आज चांगली उघडीप दिल्याने मतदानांचा टक्का वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मावळ तालुक्यातील 370 मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, आरपीआय या महायुतीचे उमेदवार व राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भेगडे आळीतील कैकाडीवाडा समाज मंदिरातील केंद्रावर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला 

भोसरी मतदारसंघातील सात व्हीव्हीपॅट मशीन बदलल्यापिंपरी : मतदान सुरू असतनाना झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे भोसरी मतदारसंघातील सात ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या. मशीनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही वेळ मतदान केंद्रावर खोळंबा झाला.    पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा क्रमांक २२ चºहोली, सु.ना..बारसे विद्यालय दिघी रोड भोसरी, मंजुरी शाळा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आदर्शनगर दिघी, पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा म्हेत्रेवस्ती, पिंपरी-चिंचवड मुला-मुलींची शाळा ८९ कुदळवाडी, पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा ९८ तळवडे गावठाण, सिद्धेश्वर हायस्कूल इंग्लिश मिडीयम स्कूल दिघी रोड भोसरी या सात मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. काही वेळाने हे मशीन बदलून मतदानाला सुरळीत सुरूवात झाली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpimpri-acपिंपरीmaval-acमावळbhokar-acभोकरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019pune-cantonment-acपुणे कन्टॉन्मेंट