शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

Maharashtra Election 2019 : विधानसभा उमेदवारांच्या प्रचारावर पावसाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 12:47 IST

सोशल मीडियावर भिस्त, रॅलीवर भर...

ठळक मुद्देनिवडणुकीची रणधुमाळी : मोकळ्या जागा, मैदानांऐवजी मंगल कार्यालयात सभांचे नियोजनविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ दहा ते बारा दिवस

पिंपरी : परतीचा पाऊस दररोज जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात रस्ते दररोज जलमय होत आहेत. काही ठिकाणी पाणी साचून राहत आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर होत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने मैदानांवरील सभा आयोजित करण्याबाबत राजकीय पक्ष द्विधा मनस्थितीत आहेत.  त्यामुळे यापुढे होणा-या काही सभा मंगल कार्यालय व सभागृहांमध्ये आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ दहा ते बारा दिवस मिळाले. त्यात विजया दशमीला उमेदवारांकडून अपेक्षित प्रचार झाला नसल्याचे दिसून येते. युती व आघाडीकडून बहुतांश ठिकाणी ऐनवेळी उमेदवारी जाहीर करण्यात आली. चिंचवड, भोसरी व पिंपरी या तिन्ही मतदारसंघात उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत सुरू होता. परिणामी उमेदवारी मिळविण्यातच इच्छुकांची दमछाक झाली. या सर्व अडथळ्यांना पार करून उमेदवारांनी प्रचारासाठी मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरुवात केली. मात्र गेल्या आठवड्यापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचण्यात अडथळे येत आहेत. शहरातील तिन्ही मतदारसंघात महायुती व आघाडीतर्फे स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन करण्यात येत आहे. यात मुख्यमंत्र्यांच्या सभेचेही नियोजन आहे. या सभा शहरातील विविध मोकळ्या जागांवर, मैदानांवर घेण्याचे नियोजन होते. मात्र पाऊस उघडीप देत नसल्याने यातील काही सभांच्या ठिकाणांत बदल करण्यात येत आहे. या पुढील सभा मंगल कार्यालय, सभागृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांची दमछाक होत आहे. स्टार प्रचारकांच्या जास्तीत जास्त सभा आपल्या मतदारसंघात व्हाव्यात, यासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्न करीत आहे. सभेचे ठिकाणही सर्वांना सोयीचे आणि जास्तीत जास्त गर्दी होऊ शकेल, यासाठी या उमेदवारांची धडपड सुरू आहे. मात्र पावसामुळे त्यांचाही नाईलाज झाला आहे. ............सोशल मीडियावर भिस्त, रॅलीवर भर  प्रचाराला कमी दिवस असून, त्यात पावसाचा अडथळा होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रचाराची भिस्त आहे. बहुतांश उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचारासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या हातातील मोबाइलवर आपला ‘मेसेज’ पोहचवून सोशल मिडियाद्वारे प्रचार करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच पावसामुळे सभा घेण्यात अडचणी येत असल्याने काही उमेदवारांकडून स्टार प्रचारकांच्या रॅलीवर भर देण्यात येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूकRainपाऊसPoliticsराजकारणAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019