शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : पिंपरीत महायुती, आघाडीतील बंडखोरांची माघार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 17:46 IST

शिवसेनेचे अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार व राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्या सरळ लढत होणार असल्याचे चित्र..

ठळक मुद्दे१३ जणांची उमेदवारी मागे, १८ उमेदवारांमध्ये लढत

पिंपरी : राखीव असलेल्या पिंपरी मतदारसंघातील महायुती व आघाडीतील ह्यबंडह्ण थंड झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर ओव्हाळ, नगरसेविका सुलक्षणा धर, नगरसेवक राजू बनसोडे, काँग्रेसचे मनोज कांबळे, सुंदर कांबळे, भाजपाचे अमित गोरखे, भीमा बोबडे, आरपीआयच्या (आठवले गट) चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह एकूण १३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी महायुती व आघाडीतील इच्छुकांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला. त्यामुळे या मतदारसंघातील लढतींकडे सर्वांचे लक्ष्य लागून होते. उमेदवारी माघारीनंतर या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार व राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्या सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर ओव्हाळ, नगरसेविका सुलक्षणा धर, नगरसेवक राजू बनसोडे, काँग्रेसचे मनोज कांबळे, सुंदर कांबळे, भाजपाचे अमित गोरखे, भीमा बोबडे, आरपीआयच्या (आठवले गट) चंद्रकांता सोनकांबळे, उत्तम हिरवे, गौरीशंकर झोंबाडे, विजय रंदिल, सतीश भवाल, संदीपान झोंबाडे या उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघारीनंतर निवडणूक रिंगणात १८ उमेदवार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण