शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : पिंपरीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 16:16 IST

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरी मतदासंघातून माजी आमदार अण्णा बनसोडे निवडणूक लढवित आहेत.

ठळक मुद्देअण्णा बनसोडे व माजी नगरसेवक जगन्नाथ साबळे यांनी केले होते पदयात्रेचे आयोजन

पिंपरी : विनापरवाना पदयात्रेचे आयोजन केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचेपिंपरी मतदारसंघातील उमेदवारासह एका माजी नगरसेवक अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथील लिंकरोड ते पिंपरीतील रमाबाई नगर झोपडपट्टी दरम्यान गुरुवारी (दि. १७) पदयात्रा काढण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार अण्णा दादू बनसोडे (वय ५०, रा. मोहननगर, चिंचवड) तसेच माजी नगरसेवक जगन्नाथ दगडू साबळे (वय ४०, रा. लिंकरोड, पिंपरी) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार राजू शिवाजी पांढरे (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठीराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरी मतदासंघातून माजी आमदार अण्णा बनसोडे निवडणूक लढवित आहेत. गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अण्णा बनसोडे व माजी नगरसेवक जगन्नाथ साबळे यांनी पदयात्रेचे आयोजन केले होते. चिंचवड येथील लिंकरोड ते पिंपरी येथील रमाबाई नगर झोपडपट्टी दरम्यान ही पदयात्रा विनापरवाना काढण्यात आली. त्यामुळे बनसोडे व साबळे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :pimpri-acपिंपरीCode of conductआचारसंहिताNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019