शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : चिंचवडला राहुल कलाटे यांची बंडखोरी कायम ;लढत चुरशीची होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 17:38 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेतील लढत ही चुरशीची होत असते.

ठळक मुद्दे पक्षाचा एबी फॉम वेळेत न पोहोचल्याने शितोळे यांचा अर्ज बाद राष्ट्रवादी पुरस्कृत करणार?

पिंपरी : विधानसभा निवडणूकीतील चिंचवड मतदार संघात भाजपाविरोधात शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज भरला होता.  अर्ज माघारीच्या मुदतीत कलाटे यांनी माघार न घेतल्याने चिंचवडची लढत चुरशीची होणार आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेतील लढत ही चुरशीची होत असते. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीसाठीभाजपाकडून आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे यांना उमेदवारी जाहिर केली होती. तर शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते कलाटे यांनीही अपक्ष अर्ज भरला होता. पक्षाचा एबी फॉम वेळेत न पोहोचल्याने शितोळे यांचा अर्ज बाद झाला होता. चिंचवड विधानसभेतील बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि भाजपाचे नेते यांच्याकडून प्रयत्न सुरू होते.  मात्र, कलाटे यांनी माघार न घेण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे चिंचवडमधील लढत रंगतदार ठरणार आहे.राष्ट्रवादी पुरस्कृत करणार?राष्ट्रवादीचा अर्ज बाद झाल्यानंतर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. राहूल कलाटे यांची बंडखोरी कायम राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कलाटे यांना पुरस्कृत करणार की नाही याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण