शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

Maharashtra election 2019: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा उमेदवारांत जल्लोष , तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा हिरमोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 5:40 PM

अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक राहिले असताना भाजपात गुरुवारी शक्तिप्रदर्शन तर राष्ट्रवादी हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ठळक मुद्देभाजपने मोठ्या प्रमाणात रॅली काढून जोरदार केले शक्तिप्रदर्शनराष्ट्रवादी काँग्रेसचा हिरमोड

पिंपरी : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक राहिले असताना भाजपात गुरुवारी शक्तिप्रदर्शन तर राष्ट्रवादी हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. केवळ 50 ते साठ कार्यकर्तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रॅलीत होते तर भाजपने मोठ्या प्रमाणात रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

 चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मतदारसंघात पदयात्रा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केलेजगताप यांनी ग्रामदैवत भैरवनाथ व जुनी सांगवीतील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर सकाळी दहा वाजता सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरूवात केली. पदयात्रेच्या सुरूवातीलाच धनगर बांधवांनी अहिल्यादेवी पुतळा परिसरात  सादर झालेले गजीनृत्य,महिलांनी केलेली फुलांची उधळण यांसह जोरदार वातावरणनिर्मिती केलीपुढे ढोरेनगर, शितोळेनगर, बॅक ऑफ महाराष्ट्र, साई चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, पिंपळेगुरव, सृष्टी चौक, वैदुवस्ती, सुदर्शन चौक, स्वराज गार्डन, पिंपळे सौदागर येथील काटे चौक, पिंपळे सौदागर गावठाण, रहाटणी, काळेवाडी, तापकीर चौकमार्गे थेरगाव येथील बापुजी बुवा मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरात दर्शन घेतले. पुढे चापेकर चौकातील क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी पदयात्रेचा समारोप केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा हिरमोडपिंपरी: उमेदवारी अर्ज दाखल करायच्या पाच मिनिटं अगोदर पोहोचल्याने लिफ्टमध्ये अडकल्याने उमेदवारी अर्ज भरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस चा मुहूर्त हुकला आहे. चिंचवड विधानसभा निवडणूक साठी दुपारी माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सर्व नेते प्राधिकरणाच्या कार्यालयात दाखल झाले पण कार्यालय सातव्या मजल्यावर असल्याने अर्ज भरण्याची मुदत संपली. त्यामुळे अर्ज न भरताच उमेदवारांना परतावे लागले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, फजल शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस