शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणार महामेट्रो; पालकमंत्री गिरीष बापट यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 18:12 IST

पुणे महामेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिशय वेगात काम करून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

ठळक मुद्देपुणे महामेट्रोच्या वल्लभनगर येथील मेट्रो स्टेशनच्या कामाचे बापट यांच्या हस्ते झाले भूमिपूजन निगडीपर्यंत मेट्रोची आवश्यकता, त्याचा डीपीआर बनिवण्याचे काम सुरु : गिरीश बापट

पिंपरी : पुणे महामेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणार आहे. या मार्गाला अगोदर सगळ्या मंजुऱ्या घेतल्या आहेत. त्यामुळे पिंपरीपर्यंत मेट्रो अगोदर सुरु होऊ द्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अतिशय वेगात काम करून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. पुणे महामेट्रोच्या वल्लभनगर येथील मेट्रो स्टेशनच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. गिरीश बापट म्हणाले, की निगडीपर्यंत मेट्रोची आवश्यकता आहे. त्याचा डीपीआर बनिवण्याचे काम सुरु आहे. पिंपरीपर्यंत मेट्रो सुरु होईपर्यंत निगडीच्या मेट्रोचा डीपीआर तयार होईल. डीपीआर बनवायला वेळ लागणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा पिंपरीपर्यंत मेट्रो सुरु होऊ द्या. नंतर दुसऱ्या टप्प्यात पहिले काम निगडीचे घेण्यात येईल. ते खूप सोपे असून आवश्यक देखील आहे. पालिकेतील पदाधिकाऱ्यांना, आयुक्तांना निगडीपर्यंतच्या मेट्रोचा डीपीआर तयार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपरीपर्यंत मेट्रो सुरु होईपर्यंत एकीकडे निगडीपर्यंतचा 'डीपीआर' तयार होईल. त्याला केंद्र, राज्य सरकाराची मान्यता घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पिंपरी ते रामवाडीचा प्लॅन अगोदर ठरला होता. त्याला महामेट्रो, केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. पहिले काम प्राथमिक अवस्थेत आहेत. ते पूर्ण होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कात्रज, सिंहगड, निगडीपर्यंत मेट्रो करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटMetroमेट्रोshravan hardikarश्रावण हर्डिकर