शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis: पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या ९६ तासांच्या आदेशाला केराची टोपली; पिंपरीत जनता मात्र सिलिंडरसाठी गॅसवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:10 IST

LPG Gas Crisis शहरात नागरिकांना चार दिवस तर सोडाच, दहा-पंधरा दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे

पिंपरी : घरपोच गॅस सिलिंडर ९६ तासांत देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश फक्त कागदावरच दिसून येत आहे. गॅस वितरकांकडून या आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवल्याचे चित्र समोर आले आहे. शहरात नागरिकांना चार दिवस तर सोडाच, दहा-पंधरा दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. विस्कळीत वितरण व्यवस्थेमुळे सर्वसामान्यांचे जगणे अक्षरशः विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वितरण सुरळीत करावे आणि दोषी एजन्सींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा ९६ तासांत गॅस हा आदेश केवळ घोषणाबाजी ठरेल, असे म्हटले आहे.

आदेशाला केराची टोपली

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी १६ मार्च रोजी घेतलेल्या बैठकीत गॅस बुकिंगनंतर ९६ तासांत सिलिंडर घरपोच देणे बंधनकारक केले होते. थेट गोदामातून विक्रीवर बंदी घालत ओटीपीद्वारेच वितरण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेशानंतर आठवडा उलटूनही प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही सुधारणा झालेली दिसत नाही. शहरातील अनेक भागांत बुकिंगनंतर चार दिवस नव्हे, तर १० ते १५ दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील तब्बल ३८ लाखांहून अधिक गॅस ग्राहकांचा पुरवठा २२२ एजन्सींमार्फत केला जातो. मात्र, पिंपरी-चिंचवड पुरवठा विभागाकडेच शहरातील अधिकृत आणि अचूक आकडेवारी नसल्याचे समोर आल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पार्किंगमध्ये चूल पेटवण्याची वेळ

गॅस टंचाईमुळे घराघरांत स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर बनला आहे. व्यावसायिक गॅस बंद असल्याने छोटे हॉटेल व्यवसायही कोलमडल्याने नागरिकांना महागड्या जेवणावर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, दैनंदिन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. काही नागरिकांना गॅस संपल्याने पार्किंगमध्ये चूल पेटवून स्वयंपाक करावा लागत असल्याचे दिसून आले.

उपासमारीची वेळ

गॅस सिलिंडर वेळेत न मिळाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. घरगुती स्वयंपाक पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांना बाहेरून महागडे जेवण मागवावे लागत आहे. काही ठिकाणी हॉटेल्सही बंद असल्याने पर्याय आणखी कमी झाले आहेत. इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर वाढला असला, तरी त्याचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. परिणामी, दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असून, नागरिकांचा संताप वाढत आहे.

एका आठवड्यापूर्वी सिलिंडर बुक केला, पण अजून मिळालेला नाही. गॅस संपल्याने पार्किंगमध्ये चूल पेटवून स्वयंपाक करावा लागत आहे. शेवटी इलेक्ट्रिक शेगडी घ्यावी लागली. - ॲड. बी. के. कांबळे, चिखली

१६ मार्चला बुकिंग केले. ९६ तासांत सिलिंडर देण्याचे आदेश होते; पण वितरक मनमानी करत आहेत. ग्राहकांची अक्षरशः कुचंबणा सुरू आहे. - प्रवीण कांबळे, गांधीनगर

गेल्या २० दिवसांपासून गॅस नाही. रोज हॉटेलवरून जेवण मागवावे लागते, तेही महाग झाले आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. - हिराचंद जाधव, पिंपरी

गेल्या २२ दिवसांपासून सिलिंडर बुक करण्याचा प्रयत्न करतोय; पण अडचणी येतात. घरात स्वयंपाकच ठप्प झाला आहे. - नितीन कोरबन, काळेवाडी

टॅग्स :PuneपुणेLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFuel Crisisइंधन टंचाईCylinderगॅस सिलेंडरcollectorजिल्हाधिकारी