शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

गॅस सिलिंडर वितरकांकडून होतेय लूट; पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 3:08 AM

सामान्य ग्राहकांना धरले जाते वेठीस; घरपोच सेवेसाठी घेतले जातात जादा पैसे

रहाटणी : सध्या या ना त्या कारणाने महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून गेला आहे. सततच्या महागाईने महिलांना घरातील महिन्याचे बजेट जुळवता जुळवता तारेवरची कसरत करावी लागत आहे. कधी भाजीपाला महाग, तर कधी पेट्रोल-डिझेल; कधी धान्य महाग, तर कधी शाळेची फीवाढ. यामुळे सर्वसामान्यांना महागाईने सळो की पळो करून सोडले आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे घरगुती वापराचा गॅस सिलिंडर. त्याचे दरही गगनाला भिडले आहेत. मात्र शासनाने आणि संबंधित गॅससिलिंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा गॅस सिलिंडर वितरक ३० ते ४० रुपये जास्त घेत आहेत. आर्थिक लुबाडणूक होत असल्याने ग्राहक कमालीचे त्रासले आहेत. याबाबत दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.कधी तरी महागाई कमी होईल, याची प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. मात्र महागाई कमी होण्याचे चिन्ह काही दिसत नाहीत. पेट्रोल व डिझेलने कमालीची उंचाई गाठली असल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. यातून कधी सुटका होणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. याचा परिणाम घरगुती वापराच्या गॅसवर झाला आहे. सध्या घरगुती वापराच्या गॅसचा दर ६५८.५८ रुपये इतका आहे, तर त्यावर ५ टक्के जीएसटी आहे. त्यामुळे सर्व करांसहित ग्राहकांना ६९१ रुपये ५० पैशांना गॅस उपलब्ध होणे आवश्यक आहे.सध्या गॅस वितरण करणाºया एजन्सीमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. शहरात पूर्वीपेक्षा अनेक एजन्सी कार्यरत आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडर घरपोच करणाºया कर्मचाºयांना दिवसाला मोजकेच सिलिंडर वितरित करण्यासाठी मिळत आहेत. त्यामुळे सिलिंडर वितरित करणारी मुले कोणाकडून ३० रुपये, तर कोणाकडून ४० रुपये आगाऊ घेत आहेत. ग्राहक तशी त्यांची रक्कम ठरवीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची लूट सुरू आहे. तक्रार करायची तरी कोणाकडे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.संबंधित एजन्सीकडे तक्रार केली, तर उलट ग्राहकांनाच डोळ्यावर धरत त्याला सिलिंडर मिळण्यास कसा त्रास होईल, असा प्रयत्न केला जातो. त्यामुळे काही ग्राहक गॅस सिलिंडरसाठी जास्तीची रक्कम मोजत आहेत.संबंधित गॅस वितरकांकडून ग्राहकांना सिलिंडर घरपोच देण्यासाठी ७३० किंवा ७४० रुपये सर्रास घेतले जात आहेत. एखाद्या ग्राहकाने आगाऊ रक्कम देण्यास मनाई केली, तर त्याला सिलिंडर दिला जात नाही. त्यामुळे ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत. पावतीपेक्षा मूॅँहमांगी किमत मागून ग्राहकांना लुटण्याचा गोरखधंदा सध्या गॅस वितरकांनी सुरू केल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.काही वेळा आगाऊ रक्कम ही डिलेव्हरी चार्जेस असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग संभ्रमात आहे. गॅस वितरक कंपन्या म्हणतात की कुठल्याही प्रकारचे चार्जेस देऊ नये किंवा पावतीपेक्षा एक पैसाही जास्त देऊ नये. असे असतानाही आगाऊ रक्कम घेण्याचे धाडस ही मंडळी कशी काय करीत आहेत, याचे कोडे अनेकांना सुटत नाही. एका ग्राहकाला वर्षाला १२ सिलिंडर अनुदान दरात दिले जातात. म्हणजे एका ग्राहकाकडून वर्षाकाठी रुपये ४०० ते ५०० जास्त घेतले जात आहेत. ही लूट का, असा प्रश्न सामान्य ग्राहकांकडून करण्यात येत आहे.काय आहे नियम?सिलिंडर ग्राहकाला घरपोच देणे किंवा ग्राहकाने संबंधित वितरकाच्या गोदामातून घेऊन जाण्याचा पर्याय आहे. ग्राहक स्वत: गोदामातून सिलिंडर घेणार असल्यास त्याने त्याबाबत अर्ज देणे आवश्यक आहे. ग्राहकाला घरपोच सिलिंडर देण्याच्या सेवेसाठी २० रुपये प्रति सिलिंडर शुल्क आकारण्यात येते. गॅस एजन्सी सिलिंडर घरपोच देत नसल्यास हे सेवा शुल्क आकारण्यात येत नाही. सिलिंडर घेण्यासाठी संबंधित वितरकाच्या गोदामात ग्राहक गेल्यास वितरकाकडून २० रुपये संबंधित ग्राहकास देणे बंधनकारक आहे किंवा सिलिंडरच्या शुल्कातून ती रक्कम वजा करणे आवश्यक आहे. असे असले, तरी सामान्य ग्राहकांना याची माहिती नसते.पैसे न दिल्यास येथे करा तक्रारग्राहकाने स्वत: गोदामातून सिलिंडर घेतल्यास त्याला वितरकाने २० रुपये परत करणे आवश्यक आहे. वितरक ही रक्कम देण्यासाठी नकार देऊ शकत नाही. तसे केल्यास १८००२३३३५५५ या क्रमांकावर ग्राहक तक्रार करू शकतात. सध्या ग्राहकांना एका वर्षात १२ अनुदानित सिलिंडर दिले जातात. त्यानंतर बाजारभावाप्रमाणे सिलिंडर खरेदी करावा लागतो.पाच किमीपर्यंत मोफत घरपोच सेवावितरकाच्या गोदामापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या ग्राहकांना मोफत घरपोच सिलिंडर पुरवठा करण्याची सेवा देणे बंधनकारक आहे. असे असतानाही प्रत्येक ग्राहकाकडून पैसे घेतले जात आहेत. वितरकाने दिलेल्या पावतीपेक्षा जास्त रकमेची मागणी करत असेल, तर टोल फ्री क्रमांकावर त्याबाबत तक्रार करता येते.सध्या मोठ्या प्रमाणात महागाईने आम्हा सर्वसामान्यांना हैराण केले आहे. त्यात भर म्हणजे रोजच लागणाºया गॅस सिलिंडरची. या सिलिंडरच्या पावतीवर नमूद केलेल्या रकमेपेक्षा तीस ते चाळीस रुपये जास्तीचे घेतले जात आहेत. जास्तीची रक्कम देण्यास नकार दिला, तर पुन्हा सिलिंडर देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे आमच्याकडे पर्याय नाही.- छाया भगत, गृहिणी

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड