शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा : स्थानिकांच्या सहभागातून शिवराज्याभिषेक सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 01:14 IST

रणरागिणी ग्रुप लोणावळा व लोणावळा विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने लोणावळा व मावळवासीयांकरिता आयोजित भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

लोणावळा  - रणरागिणी ग्रुप लोणावळा व लोणावळा विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने लोणावळा व मावळवासीयांकरिता आयोजित भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. लोणावळा शहर व परिसरातील एक हजार स्थानिक कलाकारांनी या महानाट्यात सहभाग घेतला होता. तर अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेली छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका डोळ्यांत साठवण्याजोगी होती.मावळचे खासदार श्रीरंग बारणे, रणरागिणी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा मंजुश्री वाघ, लोणावळा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुकेश परमार, कार्याध्यक्ष बाळासाहेब कडू, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, राष्ट्रवादी शहराध्यक्ष जीवन गायकवाड, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील इंगूळकर, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा पुष्पा भोकसे, मुख्याधिकारी सचिन पवार,पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते या महानाट्याचे दीपप्रज्वलन करण्यात आले.छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्र गुलामगिरीच्या साखळदंडांनी वेढला होता. रयतेला याच गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जिजाऊंच्या पोटी शिवसूर्याचा जन्म झाला आणि शिवरायांनी मुघल सलतनत विरुद्ध बंड करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. ६ जून १६७४ साली शिवतीर्थ रायगडावर रयतेचा राजा सिंहासनाधीश्वर झाला. ३२ मण सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. तो सुवर्ण क्षण आणि छत्रपती शिवरायांचा संपूर्ण जीवनपट प्रत्यक्ष रायगडाच्या प्रतिकृतीसह या महानाट्याद्वारे सादर करण्यात आला.लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र प्रस्तुत व शिवदुर्ग मित्रचे प्रवीण देशमुख लिखित निर्मित व दिग्दर्शित या महानाट्याचे रणरागिणी ग्रुपच्या संस्थापिका मंजुश्री वाघ, लोणावळा विकास प्रतिष्ठानचे मुकेश परमार व बाळासाहेब कडू यांनी मावळ व लोणावळावासीयांकरिता मोफत आयोजन केले होते. लोणावळा शहर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच वाहतूक कोंडी रोखण्याकरिता नियोजन केले होते.स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे : वाघशिवराज्याभिषेक सोहळा या महानाट्याची निर्मिती लोणावळा शहरातील युवकांनी केली असून, त्यामध्ये काम करणारे कलाकार हे देखील स्थानिक आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव देत या महानाट्याचा पहिला प्रयोग आपल्याच शहरात सादर करण्याकरिता व स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्याकरिता या महानाट्याचे आयोजन केले असल्याचे आयोजक व रणरागिणी ग्रुपच्या संस्थापिका मंजुश्री वाघ यांनी सांगितले.महानाट्यात सहभागी असलेले आपल्याच गावातील एक हजारकलाकार, शंभर फुटाचा भव्य रंगमंच, घोडे, उंट, बैलगाड्या,जिवंत तोफा, आक्रमक लढाया, नगारखाना, मेघडंबरी हे सर्व पाहण्याकरिता व छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळाहा क्षण याची देही याची डोळा पाहण्याकरिता नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. लोणावळा शहर पोलिसांनी महानाट्याच्या ठिकाणी तसेच शहरात चोख बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था राखत कोंडी रोखण्याकरिता नियोजन केले होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे