लोणावळा पालिका बनली डिजिटल
By Admin | Updated: January 30, 2016 03:59 IST2016-01-30T03:59:51+5:302016-01-30T03:59:51+5:30
महाराष्ट्रातील ब व क नगर परिषदांमध्ये पहिली डिजिटल नगर परिषद बनण्याचा मान लोणावळा नगर परिषदेला मिळाला आहे. २६ जानेवारी २०१६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून

लोणावळा पालिका बनली डिजिटल
लोणावळा : महाराष्ट्रातील ब व क नगर परिषदांमध्ये पहिली डिजिटल नगर परिषद बनण्याचा मान लोणावळा नगर परिषदेला मिळाला आहे. २६ जानेवारी २०१६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोणावळा नगर परिषदेमध्ये सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन सेवांचा शुभारंभ नगराध्यक्ष अमित गवळी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. नगर परिषदेमधील सर्व सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत.
आॅनलाइन सेवांमध्ये नागरिकांना जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, थकबाकी नसल्याचा दाखला, मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र, कर उतारा, वारसा हक्क मालमत्ता, हस्तांतरण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, झोन दाखला, बांधकाम परवानगी, भाग नकाशा, भोगवटा प्रमाणपत्र, नळजोडणी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र अशा अनेक आॅनलाइन सेवा नगर परिषदेमार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांना ६६६.’ेू.ङ्म१ॅ.्रल्ल या संकेतस्थळावरून जाऊन या सुविधेचा लाभ घेता येईल. आॅनलाइन प्रणालीमुळे नागरिकांना या सुविधांचा लाभ घेणे सोयीस्कर होणार आहे.
पहिल्या २ दिवसांतच ५१७५ नागरिकांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे. साधारण २५ नागरिकांनी सेवा अधिकाराद्वारे प्रमाणपत्र प्राप्त केली आहेत. तरुणवर्ग व शहराबाहेर राहत असणाऱ्या मिळकतधारकांनी विशेष कौतुक केले आहे. मुख्याधिकारी गणेश शेटे यांचे अथक परिश्रम व नगराध्यक्ष अमित गवळी यांची साथ यांमुळे लोणावळा नगर परिषद महाराष्ट्रातील पहिली डिजिटल नगर परिषद बनली आहे. आॅनलाइन सेवा सुरू करणाऱ्यांसाठी मायनेट प्रणालीचे ज्ञानेश्वर चिंतामणी, कुणाल गांधी व नगर परिषदेच्या फॅसिलिटी मॅनेजर सोनाली सासवडे यांनी अथक प्रयत्न घेतले. (वार्ताहर)