शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Lonavala Rain News : लोणावळ्यात चोवीस तासांत तब्बल २२१ मिलिमीटर पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:20 IST

जनजीवन विस्कळीत : वाकसई चाळ, कार्ला, मळवलीत सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी; मळवली-देवले रस्ता पाण्याखाली, सर्व नद्या धोक्याच्या पातळीवर

लोणावळा : पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात गुरुवारी दुपारपर्यंत २४ तासांत तब्बल २२१ मिलिमीटर म्हणजेच ८.७० इंच पाऊस झाला. या हंगामामध्ये एकूण ११६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील दोन दिवसांपासून लोणावळा शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पात्राला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून, ग्रामीण भागात ओढे-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. ग्रामीण भागात इंद्रायणी नदीला पूर आला आहे. वाकसई चाळ, कार्ला, मळवली परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून पुढील चार ते पाच दिवस राज्यात अतिवृष्टी ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.

हुडको कॉलनीत पाणी शिरण्याची भीती

मावळ परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने सर्व नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने पूरस्थितीत वाढ होत आहे. लोणावळा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास नैसर्गिकरीत्या लोणावळा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. त्यामुळे येथील हुडको कॉलनी आणि परिसरात पाणी शिरण्याची भीती आहे.

कार्ला, मळवलीत इंद्रायणी नदीस पूर

कार्ला, मळवली परिसरात इंद्रायणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पूर आला आहे. मळवली-देवले रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असून मळवली, पाटण परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlonavalaलोणावळा