स्वप्नातील घरासाठी लोकमत प्रापर्टी शो

By Admin | Updated: February 14, 2016 03:19 IST2016-02-14T03:19:25+5:302016-02-14T03:19:25+5:30

मेट्रो सिटी, स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात घर घेण्यास नागरिक पसंती देत आहेत. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने चिंचवडच्या आॅटो

Lokmat Property Show for Dream House | स्वप्नातील घरासाठी लोकमत प्रापर्टी शो

स्वप्नातील घरासाठी लोकमत प्रापर्टी शो

पिंपरी : मेट्रो सिटी, स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात घर घेण्यास नागरिक पसंती देत आहेत. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने चिंचवडच्या आॅटो क्लस्टरमध्ये दि. २७ व २८ फेब्रुवारीला ‘लोकमत पीसीएमसी प्रॉपर्टी शो २०१६’चे आयोजन केले आहे. त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड स्टेशन येथील आॅटो क्लस्टरच्या प्रांगणात हे प्रदर्शन होत असून, उद्योगनगरीत लोकमतच्या वतीने प्रथमच अशा प्रॉपर्टी शोचे आयोजन केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडलगत चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे
अशा विविध परिसरात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प साकारत आहेत. नियोजनबद्ध विकासामुळे या भागात घर घेण्यास मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक प्राधान्य देत आहेत. अत्याधुनिक अ‍ॅमिनेटीजसह बजेट होमसह लक्झुरियस घर असे स्वप्नातलं घर साकारण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाचा असतो. स्वप्नातील घराला बळकटी देण्याचा प्रयत्न लोकमत समूहाने केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच उपनगरातील परिसरात घर निवडण्याची संधी या वेळी उपलब्ध असणार आहे.
शेकडो प्रकल्पांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. प्रदर्शनाच्या एकाच ठिकाणी असंख्य आॅफर्स उपलब्ध असणार आहेत. २७ व २८ फेब्रुवारीला सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. विनाशुल्क प्रवेश असणार आहे. या प्रॉपर्टी शोमध्ये सहभागी होऊन नागरिकांनी आपले घराचे स्वप्न पूर्ण करावे, मनपंसद घर आरक्षित, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे टायटल
स्पॉन्सर एलोरा अँड सिद्धी ग्रुप
असून, पॉवर्ड बाय स्पॉन्सर बिग इंडिया ग्रुप आहे. तसेच बेव्हरेज पार्टनर ऊर्जा ग्रुप आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lokmat Property Show for Dream House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.