शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट : पिंपरी चिंचवड महापालिकेची सुरक्षा व्यवस्था होणार कडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 20:14 IST

महापालिका कार्यालयाच्या सुरक्षेबाबत लोकमतने स्टिंग ऑपरेशन केले होते.

ठळक मुद्देमुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरी व्हिजिटर व्यवस्थापन सिस्टीम अद्ययावत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक असते. सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टरमधून तपासणी करून नागरिकांना मनपाभवनात प्रवेश दिला जात असला आणि सीसीटीव्हीचा वॉच असला, तरी महापालिका भवनात आलेल्या व्यक्तीची माहिती उपलब्ध होत नसते. त्यामुळे महापालिकेची सुरक्षा कडक करण्याच्या दृष्टीने मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरी व्हिजिटर व्यवस्थापन सिस्टीम अद्ययावत करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीत महापालिकेची चार मजली प्रशासकीय इमारत आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेता यासह विविध विषय समिती सभापतींची दालने आहेत. या मुख्य प्रशासकीय इमारतीत शहरातील नागरिक आपल्या विविध कामांसाठी, त्याचे निराकरण करण्यासाठी दररोज येत असतात. या नागरिकांची नोंद घेण्यासाठी हस्तलिखित गेट पास देण्यात येतो. सन २०१२ ते २०१६ या काळात गेट पास संगणकीय मशिनद्वारे दिला जात होता. मात्र, हा संगणक जुन्या मॉडेलचा असल्याने तो बंद पडला आहे. त्यामुळे पुन्हा हस्तलिखित गेट पास देण्यात येत आहे. लोकमतच्या वृत्ताची दखल महापालिका कार्यालयाच्या सुरक्षेबाबत लोकमतने स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यावरून महापालिका सर्वसाधारण सभेत गोंधळही झाला होता. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महापालिकेत कामांसाठी येणाऱ्यांची माहिती अद्ययावतपणे नोंदवून घेतल्यास व्हिजिटरची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. नवीन यंत्रणेद्वारे व्यक्तीची माहिती, छायाचित्र, कोणत्या कामासाठी आली आहे. ही माहिती नोंदविली जाणार आहे. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन स्थायी समिती अध्यक्षांनी सुरक्षा यंत्रणा कडक करण्यासाठी नवीन उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.विलास मडिगेरी म्हणाले, महापालिका भवनात व्हिजिटर येत असतात. काही वर्षांपूर्वी व्हिजिटर पास हे संगणकाद्वारे देण्यात येत होते. मात्र, आता ही यंत्रणा तीन वर्षांपासून बंद पडली आहे. त्यामुळे सुरक्षा विभागाला व्हिजिटर पास व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक सिस्टीम सॉफ्टवेअरसह दोन संगणक संच सुरक्षा विभागास उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या यंत्रणेमध्ये व्हिजिटरच्या फोटोची सोय असावी, त्याचा डेटा भरण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती घेण्याची व्यवस्था असावी, विविध सोयी-सुविधादेऊन व्यवस्था अद्ययावत करावी.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड