शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

लोकमत इम्पॅक्ट : पिंपरी चिंचवड महापालिकेतील ७५० कोटींची रस्ते सफाईची निविदा अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 12:58 PM

रस्ते साफ सफाई यांत्रिक पद्धतीने करण्यासाठी निविदा केली होती प्रसिद्ध त्यासाठी सुमारे ६५० कोटी रुपये खर्च अपेक्षित

ठळक मुद्देया निविदेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अळीमिळी

पिंपरी : यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईच्या निविदेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अळीमिळी असल्याचे ‘लोकमत’ने उघड केले होते. या निविदेतील त्रुटी, त्यावर जोरदार टीका झाली होती. चौकशीत तथ्यता आढळल्याने राजकीय दबाव असतानाही, न जुमानता महापालिका आयुक्त महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ७५० कोटींची निविदा रद्द केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील रस्ते साफ सफाई यांत्रिक पद्धतीने करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली, त्यासाठी सुमारे ६५० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी टंडन अर्बन सोल्युशन्सची रस्ते व रूट तयार करणे, सर्व्हे करणे, आरएफपी तयार करणे व निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्ती  २४ ऑगस्ट २०१८ रोजी केली होती. त्यानंतर स्थायी समितीने दिनांक १९ सप्टेंबरला आयत्यावेळी मान्यता दिली होती. निविदेचा कार्यकाल आठ वर्षांचा असल्याने ९७ कोटी रुपये प्रतिवर्ष खर्चास सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी शिफारस करण्यासाठी दि. १९ जुलै २०१९ च्या स्थायी समितीच्या सभेत आयत्यावेळीचा विषय म्हणून सादर केला होता. त्यानंतर सर्वसाधारण सभेतही मान्यता दिली होती. या निविदेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अळीमिळी आहे, असे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते.त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ७ वर्ष कालावधी व सरासरी वार्षिक १०६.३३कोटी रुपये खचार्चा प्रस्ताव नव्याने तयार करण्यात आला. वाढीव खर्चाचा विषय सत्ताधाऱ्यांनी महापालिका सभेसमोर उपसूचनेद्वारे ऐनवेळी आणून मंजूर करण्याचा प्रयत्न होता. मात्र, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी भूसंपादनांच्या विषयांवरून सभागृहात ग्लास फोडल्यानंतर गोंधळ झाल्याने हा विषय मंजूर झाला नाही. त्यानंतर या निविदा प्रक्रियेबाबत सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी केला होती. त्यानुसार सुनावणी झाली. त्यात आयुक्तांनी आक्षेप नोंदविले होते.याबाबत आयुक्तांनी चौकशी करून ही निविदा रद्द केली आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निविदा प्रक्रियेमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी राहिल्याचे निदर्शनास येत असल्याचे म्हटले आहे.

.....................................................................

आयुक्तांनी दिलेले निष्कर्ष आणि आदेश१) आरोग्य विभागाने या कामासाठीच्या सल्लागारांना सविस्तर निविदेतील अटी शर्ती वास्तवदर्शी पुनर्विलोकन करुन फेरप्रस्ताव सादर करण्यास कळवावे.  त्यात सध्या कार्यरत असलेल्या कामगारांचा सेवा सातत्याचा विचार मानवतेच्या दृष्टीकोनातून करुनच पुढील यांत्रिकीकरणाची निविदा सिद्ध करावी.२) विविध सभा कामकाजासंदर्भात नियमावली अधिक स्पष्ट व कायद्यावर आधारित अशी करुन त्याला विधीवत  विधी व  सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी. कामकाजातील त्रुटी राहणार नाही याची दक्षता नगरसचिवांनी घ्यावी.  प्रशासनाकडून दाखल झालेले विषय आयुक्तांच्या पत्राशिवाय ऐनवेळचे विषय म्हणून दाखल करुन घेण्यात येऊ नयेत.३) महत्वाच्या निविदा करतांना व त्याचे विषयपत्र व ठराव सभागृहासमोर आणतांना योग्य ती खबरदारी घेऊन संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्दबातल होऊन भविष्यात कालापव्यय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी,  विभाग प्रमुख आणि आरोग्य वैद्यकीय अधिकाºयांनी घ्यावा.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसshravan hardikarश्रावण हर्डिकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा