शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट : अखेर बीआरटी मार्गात बसशिवाय अन्य वाहनांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 17:01 IST

बीआरटी सेवेत अडथळा निर्माण होत असल्याने बीआरटी मागार्तून बसश्विाय अन्य वाहनांना प्रवेश बंद घातली आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दिले आहेत. 

पिंपरी : महापालिकेने दापोडी ते निगडी या मार्गावर बीआरटी बस सेवा सुरू  करून आठवडा झाला आहे. आठवड्यानंतर बीआरटी मागार्तून अन्य वाहनेही मोठ्या जात आहेत. त्यामुळे बीआरटी सेवेत अडथळा निर्माण होत असल्याने बीआरटी मागार्तून बसश्विाय अन्य वाहनांना प्रवेश बंद घातली आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दिले आहेत. 

        दहा वर्षांनंतर दापोडी-निगडी या बीआरटी मार्गाची सुरूवात ही आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रयत्नातून झाली. मागील आठवड्यात या मार्गाची सुरूवात झाली. दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गावर बीआरटी बस व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन आणि पोलीस वाहने यांना प्रवेश देण्यात आला आहे. अन्य वाहने बीआरटी मागार्तून धावताना आढळल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,असे आयुक्त हर्डीकर यांनी माध्यमांना सांगितले होते. यासाठी महामार्गावर बीआरटी मार्गात जाणे आणि मार्गातून बाहेर येणे अशा इन आणि आऊटच्या ठिकाणी ट्राफीक वॉर्डनचीही नियुक्ती केली होती.

        मात्र, ट्रॉफीक वॉर्डन असतानाही या मार्गातून मोठयाप्रमाणावर वाहने जात आहेत, याबाबतची पाहणी लोकमतने केली होती. बीआरटी मार्गातील त्या वाहनांवर कारवाई होणार कधी? असे वृत्त हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसिद्ध झाले होते. सर्रासपणे बीआरटी मार्गातून बस शिवाय अन्य वाहने जातात मात्र कारवाई होत नाही, याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने या वृत्ताची दखल घेऊन कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. 

सूचना आणि हरकती मागविल्याअपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे  यांनी आदेश प्रसिद्ध केला आहे. रानडे म्हणाले, ‘‘बीआरटीसाठी अडथळा निर्माण होतो. त्यासाठी आदेश दिले आहेत.  तसेच बीआरटी मार्गात पार्किंग देखील करता येणार नाही. याबाबत यापूर्वी जर कोणते आदेश काढले असतील तर ते सर्व आदेश रद्द करण्यात येत आहेत. दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गावर अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांना काही हरकती अथवा सूचना असतील तर नागरिकांनी आपल्या हरकती अथवा सूचना लेखी स्वरूपात १२ सप्टेंबरपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयात पाठवाव्यात, असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे. नागरिकांच्या सूचना आणि हरकती यांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMPMLपीएमपीएमएलTrafficवाहतूक कोंडी