शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

लाॅकडाऊन; डिझेलचा खप १०९ लाख टनांनी घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 01:31 IST

पेट्रोलच्या खपामध्ये तूट : उद्योग-व्यवसायांचा गाडा अजूनही नाही रुळावर

विशाल शिर्के

पिंपरी : कोरोनामुळे (कोविड-१९) उद्योग आणि व्यवसायाची विस्कटलेली घडी अजूनही व्यवस्थित झाली नसल्याचे डिझेल खपाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत डिझेलचा खप गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १०.९ दशलक्ष टनांनी (१०९ लाख टन) घटला आहे. पेट्रोलचा खपही ३.५ दशलक्ष टनांनी घटला असल्याची माहिती समोर आली आहे. 

पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च-२०२०च्या शेवटच्या सप्ताहात देशात टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक आणि जनजीवन ठप्प पडले. या काळात पेट्रोल-डिझेलचा खप नीचांकी पातळीवर आला. 

जून २०२० नंतर देशासह राज्यात टाळेबंदीचे नियम हळूहळू शिथिल करण्यात आले. त्यानंतर उद्योगांचा गाडा हळूहळू रुळावर येऊ लागला. उद्योगांसाठी, माल आणि प्रवासी वाहतुकीसाठी देशात डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनॅलिसिस सेलने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१९-२०च्या तुलनेत एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांतील डिझेलचा खप १०९ लाख टनांनी घटला आहे. जानेवारी-२०२० च्या तुलनेत जानेवारी-२०२०१ मधील डिझेलचा खप २ लाख टनांनी कमी आहे. अजूनही इंधनाची मागणी पूर्वपदावर आलेली नाही.पेट्रोलच्या खप २०१९-२० च्या तुलनेत एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत ३५ लाख टनांनी घटला आहे. जानेवारी-२०२० च्या तुलनेत जानेवारी २०२१ मध्ये पेट्रोलच्या मागणीत १ लाख टनांनी वाढ झाली. म्हणजे पेट्रोलची मागणी वाढली आहे. जनजीवन पूर्वपदावर आल्याने खासगी वाहनांकडून मागणी वाढल्याने ही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

डिझेलची मागणी अजून ७० टक्क्यांवर देखील आली नाही. लांब पल्ल्याची माल वाहतूक करणारे ट्रक कमी असल्याने डिझेलचा खप कमी झाला आहे. - अली दारुवाला, राष्ट्रीय प्रवक्ता, पेट्रोल अँड डीलर्स असोसिएशन

एप्रिल ते जानेवारी देशातील इंधन खप 

इंधन प्रकार     २०१९-२०     २०२०-२१पेट्रोल     २५.३     २२.८डिझेल     ६९.८     ५८.९

जानेवारी महिन्यातील इंधनाचा खप 

इंधन प्रकार     २०२०     २०२१पेट्रोल     २.५     २.६डिझेल     ७.०     ६.८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPetrol Pumpपेट्रोल पंप