शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड महापालिकेतील शहर अभियंता पदावरून लॉबिंग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:47 IST

शहर अभियंता पदासाठी शासनाकडून प्रतिनियुक्तीवरील अधिकारी येणार असल्याची कुणकुण महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना लागली आहे..

ठळक मुद्देशासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी येण्याची चर्चासत्ताधारी भाजपा प्रशासनावर दबाव टाकत आहे, राष्ट्रवादीने केला आरोप

पिंपरी : महापालिकेतील शहर अभियंतापदी शासनाकडून प्रतिनियुक्तीवरील अधिकारी येणार असल्याची कुणकुण लागल्याने स्थानिक अधिकाऱ्याला संधी द्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे. ‘शहर अभियंत्याबाबत नगरविकास खात्याचे पत्र नसतानाही नवीन अधिकाऱ्याला कसे रूजू करून घेतले, त्यात सत्ताधारी भाजपा प्रशासनावर दबाव टाकत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शहर अभियंता अंबादास चव्हाण नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्यानंतर सह शहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे शहर अभियंता पदाचा तात्पुरता कार्यभार दिला आहे. दरम्यान शहर अभियंता पदासाठी शासनाकडून प्रतिनियुक्तीवरील अधिकारी येणार असल्याची कुणकुण महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना लागली आहे. त्यामुळे यापदावर स्थानिकच अधिकाऱ्याला संधी मिळावी, यासाठी लॉबिंग सुरू झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता अ. मा. भालकर यांना महापालिकेने रूजू करून घेतले आहे. त्यांना शहर अभियंतापदी नियुक्त करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना समजताच त्यांनी विरोध दर्शविला आहे. माजी महापौर राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, पंकज भालेकर, प्रज्ञा खानोलनकर, श्याम लांडे, जावेद शेख, अपक्ष आणि स्थायीचे माजी सभापती नवनाथ जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यात भालकर यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे..........मसाळ म्हणाले, ‘‘नगरविकास खात्याचे पत्र नसतानाही भालकर यांना रूजू करून घेण्याचा घाट घातला जात आहे. भाजपातील स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली प्रशासन काम करीत आहे. यात अर्थकारण झाले असावे. याबाबत आयुक्तांनी दखल न घेतल्यास न्यायालयात जाऊ.’’........जावेद शेख म्हणाले, ‘‘नगरविकास खात्याचे पत्र नसताना शहर अभियंतापदी अधिकारी आणला जात आहे. तो महापालिकेचा जावई आहे का? स्थानिक अधिकाऱ्यांना संधी द्यायला हवी.’’..........आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘सार्वजनिक बांधकाम विभागाने सेवामुक्त करून भालकर यांना महापालिकेसाठी पाठविले आहे. त्यांना महापालिका प्रशासनाने रूजू करून घेतले आहे. त्यांना कोणताही चार्ज दिलेला नाही. नगरविकास खात्याचे पत्र मिळाल्यानंतर त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवायची हे ठरविणार आहे.’’  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस