शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

घराजवळ पुरली हातभट्टीची गावठी दारू: सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 21:52 IST

हिंजवडी परिसरात साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलिसांपासून बचावासाठी अवैध धंद्यावाले अनेक शक्कल लढवतात. अशाच प्रकारे एका महिलेने गावठी हातभट्टीची दारू तयार करून कॅनमध्ये भरून घरामागच्या मोकळ्या जागेत पुरायची. त्या दारूची वाहतूक करून आसपासच्या परिसरात विक्री करायची. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने या दारुभट्टीवर छापा मारत हा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवईत तीन लाख ५२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणात एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरे दत्तवाडी रोडलगत असलेल्या शिवांजली नगर, हिंजवडी येथे एक महिला ही गावठी हातभट्टीची दारू तयार करून ती दारू प्लास्टिक कॅनमध्ये भरून ते कॅन तिच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या मैदानात पुरत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (दि. ४) दुपारी सव्वाएकच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. दोन लाख ८० हजारांची टाकी, त्यात साडेतीन हजार गावठी दारू बनविण्याचे रसायन, एक हजारांची लोखंडी टाकी, ५०० रुपयांची मोकळी टाकी, २०० रुपयांचा एक पाईप, ७० हजार रुपये किमतीची ७०० लिटर गावठी हातभट्टीची दारू, असा एकूण तीन लाख ५२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी जप्त केला. 

आरोपी महिला ही गावठी हातभट्टीची दारू तयार करून प्लास्टिक  कॅनमध्ये भरून साठवत होती. दारूचे ते कॅन तिच्या राहत्या घरामागील मोकळ्या जागेत पुरायची. तसेच तिला शक्य होईल तेव्हा वाहतूक करून आजबाजूच्या परिसरात ती दारू विक्री करायची. पोलिसांनी कारवाई करून दारू तयार करण्याचे रसायन नष्ट केले. तसेच जमिनीत पुरलेले दारूचे कॅन उकरून काढून जप्त केले.  

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, प्रणिल चौगले, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, संतोष बर्गे, भगवंता मुठे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडliquor banदारूबंदीPoliceपोलिसWomenमहिला