शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये; पिंपरी महापालिका सज्ज, आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात

By विश्वास मोरे | Updated: June 9, 2024 18:40 IST

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले संपर्क क्रमांक २४ तास सुरु ठेवावावेत आणि घटनास्थळी तातडीने दाखल होऊन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळावी, आयुक्तांच्या सूचना

पिंपरी : मान्सूनचे आगमन झाले आहे. या काळात रात्रीच्या वेळी शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय रात्रपाळीत आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात केले आहे. 'मान्सून काळात कोणत्याही परिस्थितीला हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले संपर्क क्रमांक २४ तास सुरु ठेवावावेत आणि घटनास्थळी तातडीने दाखल होऊन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळावी, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.  महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पर पडली, त्यावेळी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा

पिंपरी चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या वाहतात. या नद्यांच्या तीरावर मोठ्यासंख्यने नागरिक वास्तव्यास आहेत. नद्यांच्या उगमाकडील भागात अतिवृष्टी झाल्यास शहरातील नदी तटावरील घरांमध्ये पाणी शिरण्याच्या शक्यता निर्माण होतात. तसेच जास्त पावसामुळे शहरात गटार, रस्ते, नाला अशा ठिकाणी पाणी तुंबणे, पाणी  घरात शिरणे, घराची पडझड होणे, वादळ वा-यामुळे झाडे पडणे अशा दुर्घटना घडू शकतात. या दुर्घटनांचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. क्षेत्रीय कार्यालायनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकामध्ये स्थापत्य विभागाचे कनिष्ट अभियंता,  जलनिस्सारण विभागाचे कनिष्ट अभियंता,  आरोग्य निरीक्षक, सफाई कामगार आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाRainपाऊसWaterपाणीfloodपूरGovernmentसरकारcommissionerआयुक्त