‘सारथी’कडे शहरवासीयांची पाठ

By Admin | Updated: January 15, 2016 04:06 IST2016-01-15T04:06:15+5:302016-01-15T04:06:15+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेने १ जानेवारीपासून ‘सारथी हेल्पलाइन’ ही सुविधा चोवीस तास सुरू केली. मात्र, याकडे नागरिकांकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गेल्या दहा दिवसांत ‘

Lessons of the city dwellers on 'Sarathi' | ‘सारथी’कडे शहरवासीयांची पाठ

‘सारथी’कडे शहरवासीयांची पाठ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने १ जानेवारीपासून ‘सारथी हेल्पलाइन’ ही सुविधा चोवीस तास सुरू केली. मात्र, याकडे नागरिकांकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गेल्या दहा दिवसांत ‘नाइट शिफ्ट’मध्ये अवघे ३४ कॉल प्राप्त झाले आहेत.
महापालिका पुरवत असलेल्या सेवा, सुविधा, महापालिका हद्दीतील प्रेक्षणीय स्थळे यांसह विविध शासकीय कार्यालयांची माहिती देण्यासाठी महापालिकेने १५ आॅगस्ट २०१३रोजी ८८८८००६६६६ या क्रमांकावर ‘सिस्टिम आॅफ असिस्टिंग रेसिडेंट्स अँड टूरिझम थ्रो हेल्पलाइन इन्फॉर्मेशन’ (सारथी) ही हेल्पलाइन सुरू केली. यामार्फत ४५ प्रकारच्या सुविधांची माहिती दिली जात असून, यामध्ये ३२ सुविधा महापालिकेशी संबंधित आहेत, तर ११ केंद्र व राज्य शासनाशी, तर दोन खासगी ेक्षेत्राशी संबंधित आहेत.
याद्वारे महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा व सुविधांबाबत तक्रारी नोंदवून घेतल्या जातात. पूर्वी ही सुविधा सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत दोन शिफ्टमध्ये सुरू होती. मात्र, १ जानेवारीपासून यामध्ये बदल करून ही सुविधा चोवीस तास सुरू करण्यात आली. यामुळे दोन शिफ्टचे कामकाज तीन शिफ्टमध्ये सुरू झाले. यास नागरिकांचा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, नागरिकांनी अनुत्सुकता दाखविल्याचे दिसत आहे.
हेल्पलाइनवर सुरुवातीला दिवसभरात सुमारे चारशे कॉल येत होते. मात्र, तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. यामुळे कॉल येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. एकूण कॉलमध्येदेखील तक्रारींपेक्षा माहिती घेण्यासाठी येणाऱ्या कॉलची संख्या अधिक आहे. त्यामुळे नागरिकही केवळ माहिती घेण्यासाठीच कॉल करीत असल्याचे स्पष्ट होते. अगोदर पंधरा तास सुरू असलेल्या उपक्रमातून योग्य सुविधा मिळत नसताना २४ तास सुरू केल्याने तरी योग्य सुविधा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Lessons of the city dwellers on 'Sarathi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.