शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रावण टोळीचा म्होरक्या गजाआड : दोन वर्षासाठी केले होते तडीपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 20:08 IST

अनेक गंभीर गुन्ह्यामुळे शहरातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला रावण टोळीचा म्होरक्या ससा ऊर्फ सागर दशरथ वाघमोडे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अ‍ॅन्टी गुंडा स्कॉड पथकाने एक देशी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.

पिंपरी : अनेक गंभीर गुन्ह्यामुळे शहरातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला रावण टोळीचा म्होरक्या ससा ऊर्फ सागर दशरथ वाघमोडे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अ‍ॅन्टी गुंडा स्कॉड पथकाने एक देशी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. ही कारवाई आकुर्डी येथील रेल्वे स्थानक परिसरात केली.

   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससा ऊर्फ सागर दशरथ वाघमोडे हा पिंपरी-चिंचवड शहरात सक्रिय असलेल्या रावण टोळीचा सूत्रधार आहे. त्याच्या विरोधात पिंपरी, चिंचवड, देहूरोड आणि पुणे शहरात विविध ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल, मारामारी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तो मागील वर्षापासून शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे, त्याच्यावर मागील वर्षीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई झाल्यानंतरही त्याच्या वर्तनामध्ये कसलीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे, त्याला जानेवारी २०१९ मध्ये पुन्हा पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र हा आदेश जुगारून तो शहरातच वावरत होता.  

    सोमवारी अ‍ॅन्टी गुंडा स्कॉड या पथकाला शहरातून तडीपार केलेला ससा ऊर्फ सागर हा शहरातील आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून ससा ऊर्फ सागर वाघमोडे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करून त्याला अटक केली आहे.  

   मागच्या काही दिवसांपूर्वी शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अ‍ॅन्टी गुंडा स्कॉडची निर्मिती केली. या स्कॉडच्या माध्यमातून शहरात गुन्हेगारावर नजर ठेवण्यात येत आहे. या स्कॉडची जबाबदारी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्याकडे देण्यात आली आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिस